गुजरातमध्ये बस आणि व्हॅनमध्ये भीषण टक्कर; 6 मृत

वृत्तसंस्था/साबरकांठा

गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात बुधवारी भरधाव खासगी बसने एका व्हॅनला मागून जोरदार टक्कर मारली आहे. या भीषण दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर व्हॅन शमलाजी येथून हिम्मतनगरच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या भरधाव खासगी बसने टक्कर मारली. ही टक्कर अत्यंत तीव्र असल्याने व्हॅनचे मोठे नुकसान झाले. दुर्घटनेत व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या 6 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बसचालकाचा निष्काळजीपणा दुर्घटनेचे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.

Comments are closed.