कच्छमध्ये भीषण रस्ता अपघात

7 ठार अन् 20 जण जखमी

जमीन: गुजरातच्या पश्चिम कच्छ जिल्ह्यात खावडानजीक एक भीषण रस्ते दुर्घटना घडली आहे. एक भरधाव बोलेरो आणि ट्रक यांची टक्क झाली आहे. या दुर्घटनेत 7 मजुरांचा जागीच मृत्यू  झाला, तर जवळपास 20 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेतंर घटनास्थळी अफरातफरीची स्थिती निर्माण झाली होती. ट्रकखाली चिरडले गेलेले मजूर जीव वाचविण्यासाठी ओरडत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या टीमने वाहनांखाली चिरडले गेलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमी मजुरांना तत्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आता या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेत आहेत. याचबरोबर मृतांची ओळख पटवून जखमींच्या स्थितीवर नजर ठेवली जातेय.

Comments are closed.