इंदूरमध्ये घराला आग, काँग्रेस नेत्याचा मृत्यू
पत्नी अन् दोन मुलींची प्रकृती गंभीर
वृत्तसंस्था/इंदोर
मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये गुरुवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. येथे काँग्रेस नेते प्रवेश अग्रवाल यांच्या घराला लागली आणि यात त्यांचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी आणि दोन मुली गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तेथे धाव घेत आग विझविली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात डॉक्टरांनी प्रवेश यांना मृत घोषित केले तर प्रवेश यांच्या पत्नी रेखा यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मुली 14 वर्षीय सौम्या आणि 12 वर्षीय मायरा जखमी झाली आहे. प्रवेश यांच्या घरातील पूजा खोलीत अखंड ज्योतमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त होतोय. धूराने श्वास कोंडल्याने प्रवेश यांचा मृत्यू झाला. प्रवेश हे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय होते.
Comments are closed.