उपग्रह प्रतिमा वापरून घर सूची ब्लॉक तयार केला जाईल

गृहमंत्र्यांकडून डिजिटल जनगणनेसाठी 4 टूल्स लाँच

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी जनगणना-2027 साठी 4 डिजिटल टूल्सचा सॉफ्ट लाँच आणि शुभंकर-‘प्रगती’ (महिला) आणि विकास’ (पुरुष)चे औपचारिक अनावरण केले आहे. देशभरात जनगणनेच्या कार्याला सुलभ करण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंगने (सी-डॅक) अॅडव्हान्स प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत. या टूल्समध्ये डिजिटल जनगणनेदरम्यान उपग्रह छायाचित्रांच्या सहाय्याने हाउस लिस्टिंग ब्लॉक तयार होणार आहे.

देशभरात 30 लाखाहून अधिक प्रगणक, पर्यवेक्षक आणि अन्य अधिकारी जनगणना-2027 मध्ये सामील होतील. दोन टप्प्यांमध्ये होणारी जनगणना पहिल्यांदाच डिजिटल माध्यमातून पार पडणार आहे. पहिल्यांदाच स्व-गणनेचा पर्यायही देण्यात येत आहे. जनगणना-2027 चे शुभंकर ‘प्रगती’ (महिला प्रगणक) आणि ‘विकास’ (पुरुष प्रगणक)ला मैत्रिपूर्ण तसेच सहज प्रतीकाच्या स्वरुपात सादर करण्यात आले आहे. तसेच ‘प्रगती’ आणि ‘विकास’ 2047 मध्ये भारताला एक विकसित राष्ट्र करण्याच्या संकल्पाला पूर्ण करण्यास महिला आणि पुरुषांच्या समान भागीदारीचे प्रतीकही आहेत.

जनगणना-2027 चे डिजिटल टूल्स…

जनगणना-2027 भारताची पहिली तांत्रिक उपकरणांद्वारे संचालित जनगणना असेल. केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्याकडून 4 प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहेत.

हाउस लिस्टिंग ब्लॉक क्रिएटर वेब अॅप्लिकेशन : हे वेब मॅप अॅप्लिकेशन चार्ज अधिकाऱ्यांना उपग्रहीय छायाचित्रांच्या सहाय्याने तांत्रिक स्वरुपात हाउस लिस्टिंग ब्लॉक करण्यास सक्षम करते, ज्यामुळे देशभरात भौगोलिक व्याप्ती सुनिश्चित होते.

एचएलओ मोबाइल अॅप्लिकेशन : हे एक सुरक्षित ऑफलाइन मोबाइल अॅप्लिकेशन असून ज्याच्या माध्यमातून प्रगणक हाउस लिस्टिंग डाटा एकत्र किंवा अपलोड करू शकतो. केवळ सीएमएमएस पोर्टल नोंदणीकृत प्रगणकच याचा वापर करू शकतो. हे अॅप्लिकेशन थेट क्षेत्रापासून सर्व्हरपर्यंत डाटा प्रेषणाची सुविधा प्रदान करते. हे अँड्राइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून ते 16 भाषांमध्ये संचालित केले जाऊ शकते.

स्व-गणना पोर्टल: पहिल्यांदाच स्व-गणनेचा पर्याय प्रदान केला जातोय. ही एक सुरक्षित वेब-आधारित सुविधा असून ज्याच्या माध्यमातून पात्र उत्तरदाता घरोघरी सर्वेक्षणापूर्वी स्वत:ची माहिती ऑनलाइन नोंदवू शकतो. यशस्वी नोंदणीनंतर एक विशिष्ट स्व:गणना आयडी जारी होईल. या स्व:गणना आयडीला प्रगणकाला पुरविण्यात येणार आहे. याच्या आधारावर नोंद करण्यात आलेल्या माहितीची प्रगणकाडून पुष्टी केली जाऊ शकेल.

जनगणना व्यवस्थापन अन् देखरेख प्रणाली पोर्टल : हे एक केंद्रीकृत वेब-आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म असून ज्याच्या माध्यमातून जनगणनेशी संबंधित कार्यक्रमांशी योजना, व्यवस्थापन, अंमलबजावणी आणि देखरेख केली जाईल. राज्य, जिल्हा तसेच तालुका स्तराचे अधिकारी एकीकृत डॅशबोर्डच्या माध्यमातून वास्तविक वेळेत प्रगती आणि कार्यस्थितीचे अवलोकन करू शकतील.

सुरक्षित मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर

जनगणना-2027 मध्ये घरोघरी जात सुरक्षित मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर करत डाटा एकत्रित केला जाणार आहे. याच्याद्वारे पूर्ण व्याप्ती सुनिश्चित होणार आहे. जनगणना 2027 दोन टप्प्यांमध्ये होणार आहे.

Comments are closed.