Points Table मध्ये उलथापालथ, सुपर-8 ची समीकरणे बदलली, सेमीफायनलसाठी टीम इंडियाचं गणित काय?

टीम इंडिया पात्रता परिस्थिती T20 विश्वचषक 2026 : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीतील एका रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 27 धावांनी पराभव केला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात दक्षिण आफ्रिकेने सरस कामगिरी केली. या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील समीकरण बिघडले असून, सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी इथून पुढचा प्रत्येक सामना भारतासाठी आता ‘करो या मरो’ असा असणार आहे. टी-20 विश्वचषकात भारताला तब्बल सुमारे 1200 दिवसांनंतर पराभवाचा धक्का बसला आहे. याआधी 2022 च्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरची विजयाची मालिका अखेर खंडित झाली आहे.

सेमीफायनलचं गणित काय? (How can Team India reach T20 World Cup 2026)

सुपर-8 फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. त्यापैकी फक्त दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. भारताने पहिलाच सामना गमावल्यामुळे पुढील समीकरण अधिकच कठीण झाले आहे. आता भारताचे सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहेत. अंतिम चारमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर हे दोन्ही सामने भारताने कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अत्यावश्यक आहे.

फक्त विजय पुरेसा ठरणार नाही, तर मोठ्या फरकाने जिंकणेही गरजेचे आहे, जेणेकरून नेट रन रेटमध्ये सुधारणा होईल. मोठ्या पराभवामुळे भारताचा नेट रन रेट घसरला असून तो पुढे निर्णायक ठरू शकतो.

आणखी एक पराभव म्हणजे थेट बाहेर

जर भारताने उरलेल्या दोन सामन्यांपैकी एक जरी सामना गमावला, तर उपांत्य फेरीची आशा जवळपास संपुष्टात येऊ शकते. एक विजय आणि एक पराभव अशी स्थिती झाल्यास, भारताला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. अशावेळी समीकरणे अधिक गुंतागुंतीची होतील.

एवढा मोठा पराभव का झाला?, भारताच्या पराभवाची कारणे कोणती? (What were the reasons for India’s defeat?)

  • या सामन्यात भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची खराब फलंदाजी आणि गोलंदाजी.
  • प्रतिस्पर्धी संघाचे सुरुवातीचे तीन गडी बाद झाल्यानंतरही त्यांनी 187 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. भारतीय गोलंदाजांना धावांवर नियंत्रण ठेवता आले नाही.
  • धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजीवर दबाव स्पष्ट दिसून आला. सलग विकेट्स पडत गेल्या आणि संपूर्ण संघ 111 धावांवर गारद झाला.
  • भारताच्या मधल्या फळीला या स्पर्धेत प्रभावीपणे आपली भूमिका बजावता आली नाही आणि या सामन्यातही तेच दिसून आले.

आता कर्णधार आणि टीम मॅनेजमेंटसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे खेळाडूंचा आत्मविश्वास पुन्हा उभा करणे.  सुपर-8 मधील पुढील दोन्ही सामने भारतासाठी ‘करो किंवा मरो’सारखे आहेत. संतुलित कामगिरी आणि मोठा विजय मिळवण्यात यश आले, तर उपांत्य फेरीची आशा अजूनही जिवंत राहू शकते.

हे ही वाचा –

Team India Narendra Modi Stadium : काळ्या मातीचा ‘काळा’ फेरा! नरेंद्र मोदी स्टेडियमवर तीन वर्षांत दुसऱ्यांदा टीम इंडियावर दु:खाचा डोंगर, कर्णधार सूर्याचा अशुभ योगायोग

आणखी वाचा

Comments are closed.