ये कोई मजाक नहीं! 50 षटकांची मॅच फक्त 5 चेंडूत जिंकली, 7 फलंदाज शून्यावर आऊट

कॅनडा अंडर 19 अंडर अर्जेंटिना अंतर्गत 19 आयसीसी मेन्स यू 19 क्रिकेट वर्ल्ड कप: क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेकदा एकतर्फी सामने पाहिले असतील, पण यावेळी असा सामना झाला ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. हा सामना खेळला गेला कॅनडा अंडर-19 आणि अर्जेंटिना अंडर-19 संघांमध्ये. आयसीसी पुरुष अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप अमेरिका पात्रता फेरी 2025 मध्ये कॅनडाने अर्जेंटिनाला अक्षरशः रडवले.

रविवारी, जॉर्जिया येथील परमवीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (ग्राउंड क्र. 2) वर खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात कॅनडाने अर्जेंटिनावर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, हा 50 षटकांचा सामना कॅनडाने फक्त 5 चेंडूत जिंकला.

गोलंदाजीत जगमनदीप पॉलचा कहर, 23 धावांत गुंडाळला अर्जेंटिनाचा संघ

अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्यासाठी चुकाचा ठरला. संपूर्ण संघ 19.4 षटकांत फक्त 23 धावांवर गारद झाला. एकाही फलंदाजाला दहाच्या घरात जाता आले नाही. सात फलंदाज तर शून्यावर बाद झाले. कॅनडाचा वेगवान गोलंदाज जगमनदीप पॉल याने भन्नाट गोलंदाजी करत फक्त 7 धावा देऊन 6 विकेट्स घेतले, त्यापैकी 3 षटके मेडन होती. त्याला डॉमिनिक डाइनस्टर आणि कृष मिश्रा यांनी प्रत्येकी 2 बळी घेऊन उत्तम साथ दिली.

50 षटकांचा सामना, 5 चेंडूत संपला

24 धावांचे लक्ष्य कॅनडासाठी केवळ औपचारिकताच होती. कर्णधार युवराज साम्रा याने 4 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकार ठोकत एकट्याने 20 धावा केल्या. परिणामी कॅनडाने सामना फक्त 5 चेंडूत आणि 10 विकेट्स राखून जिंकला. वेळेच्या हिशोबाने पाहिल्यास ही पारी फक्त 5 मिनिटांत संपुष्टात आली.

विक्रम मोडण्याची संधी हुकली

हा सामना जर अधिकृत युथ वनडे स्वरूपात झाला असता, तर सर्वात कमी चेंडूत लक्ष्य गाठण्याचा विक्रम मोडला गेला असता. सध्या हा विक्रम ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाच्या नावावर आहे, त्यांनी 2004 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 22 धावांचे लक्ष्य 3.5 षटकांत पूर्ण केले होते.

कॅनडा संघाची विजयी घोडदौड

या विजयानंतर कॅनडा अमेरिका पात्रता फेरीत मजबूत स्थितीत आहे. या स्पर्धेत अर्जेंटिना, बरमूडा, कॅनडा आणि यजमान अमेरिका हे संघ आहेत. डबल राऊंड-रॉबिन पद्धतीनुसार प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध दोनदा खेळणार आहे. सर्वाधिक गुण मिळवणारा संघ 2026 आयसीसी पुरुष अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये अमेरिका भागाचे एकमेव प्रतिनिधित्व करेल.

हे ही वाचा –

Team India Squad For Asia Cup 2025 : इंग्लंडमध्ये नेतृत्त्व सिद्ध करुन दाखवलं, तरी आशिया कपमध्ये शुभमन गिलऐवजी ‘हा’ खेळाडू टीम इंडिया उपकर्णधार? BCCI चा फेव्हरिट कोण?

आणखी वाचा

Comments are closed.