Relationship : वर्कलोडमुळे पार्टनरबरोबर होतेय तू तू मैं मैं, मग वापरा हे स्किल

वाढती महागाई पाहता घर-संसार सांभाळणे कोणा एका जोडीदाराच्या हातात राहिले नाही आहे. घराचा हफ्ता, गाडीचे EMI, बिल्स, मुलांचे शिक्षण या सर्वाचा खर्च करण्यासाठी दोघांनीही नोकरी करणे आता आवश्यक झाले आहे. त्यामुळे सकाळी घाई-गडबडीत निघालेले दोघं नवरा बायको रात्रीचं घरी येत आहे. या रोजच्या रूटीनमुळे मात्र नात्यावर गंभीर परिणाम होत आहे. पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये कोणत्याच प्रकारचे तारतम्य नसल्याने काही जोडप्यांमध्ये दररोज तू तू मैं मैं होत आहे. अनेकजण घरीही कामाचा व्याप घेऊन येत असल्याने नात्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे आज आपण नात्यातील पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ कशी बॅलन्स करायची आणि रोज होणारी पार्टनरबरोबरची तू तू मैं मैं कशी थांबवायची हे जाणून घेऊया,

  • नात्यात काम आणि प्रेम याचा समतोल साधण्यासाठी तुम्हाला दिवसाचे रुटीन ठरवणे आवश्यक असते. यासाठी सर्वात पहिले जर कामाचा वेळ आणि वैयक्तिक वेळ वेगवेगळा ठेवा.
  • ऑफिसचे काम घरी आणणे टाळा. घरी आल्यावरही ऑफिस कॉल्स घेणे टाळा. घरी आल्यावर कुटूंबाला वेळ द्या.
  • ऑफिसमधील प्रत्येक कामाला हो बोलण्याची चूक करू नका. यामुळे वेळतर जाईल शिवाय एनर्जी डाऊन होईल.
  • नात्यातील प्रेम वाढवण्यासाठी एकमेकांना क्वालिटी टाइम देणे आवश्यक आहे. या क्वालिटी टाइममध्ये मोबाइल, लॅपटॉप यापासून दूर राहावे आणि तुमचा संपूर्ण वेळ पार्टनरसाठी काढावा.
  • जर तुम्ही घरून काम करत असाल तर कामाची वेळ निश्चित करा.

  • फ्रिलान्सर असाल तर दिवसाचे किती तास तुम्ही हे काम करणार आहात, हे ठरवा. उरलेला पूर्ण वेळ पार्टनरला द्या.
  • आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी पार्टनरसाठी सरप्राइझ प्लॅन करता येईल.
  • सुट्टीच्या दिवशी ऑफिसची कामे घेऊ नका, यामुळे पार्टनर नाराज होऊ शकतो.
  • तुम्ही सहा महिन्यातून एकदा लॉंग ट्रिपचा प्लॅन करू शकता. यामुळे दोघांना एकांत मिळेल, मनसोक्त गप्पा मारता येतील आणि रोजच्या रूटीनपासून आराम मिळेल.
  • पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्याच्यासोबत स्वत:कडे लक्ष द्यावे.
  • मानसिक आणि शारीरिकरित्यादृष्ट्या फिट राहण्याचा प्रयत्न करा.
  • तुम्ही एकमेकांना वेळ देण्यासाठी सकाळची एक्सरसाइज एकत्र करू शकता. यामुळे एकमेकांना वेळही मिळेल आणि एक्सरसाइजही होईल.
  • दोघांनी एक नियम ठेवाव, सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण एकत्र करावे.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=Em3mgumb03w

Comments are closed.