दोन विजय, एक पराभव अन् खात्यात फक्त 4 गुण, टीम इंडिया सेमी फायनलमध्ये कशी पोहोचणार? टेन्शन वा
आयसीसी महिला विश्वचषक 2025 अद्यतनित पॉईंट टेबल : आयसीसी महिला विश्वचषक 2025 मधील दहावा सामना 9 सप्टेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांदरम्यान विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाला स्पर्धेतील पहिला पराभव पत्करावा लागला. जरी या पराभवामुळे पॉइंट्स टेबलवर फारसा फरक पडला नसला, तरी सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांना नक्कीच धक्का बसला आहे, कारण इतर संघ सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यामुळे भारताला उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, जेणेकरून सेमीफायनलमध्ये सहज प्रवेश मिळू शकेल.
भारत सध्या तिसऱ्या स्थानावर
सध्या स्पर्धेतील 10 सामने खेळल्या गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडिया तीन सामने खेळले आहेत. टीम इंडियाने दोन विजय आणि एक पराभव अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या खात्यात चार गुण (+0.959) असून तो पॉइंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया महिला संघ विराजमान आहे. कांगारू संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे त्यांच्या खात्यात पाच गुण (+1.960) जमा आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि भारताव्यतिरिक्त, टॉप-4 मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंड चार गुणांसह (+1.757) दुसऱ्या स्थानावर आहे, भारत तिसऱ्या स्थानावर आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ चार गुणांसह (-0.888) चौथ्या स्थानावर आहे. सध्या टॉप 4 च्या बाहेर असलेल्या चार संघांमध्ये बांगलादेश (+0.573), श्रीलंका (-1.255), न्यूझीलंड (-1.485) आणि पाकिस्तान (-1.887) महिला संघांचा समावेश आहे.
टीम इंडिया सेमी फायनलमध्ये कशी पोहोचणार? (How Team India Can Qualify For Women’s World Cup Semifinals)
हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने यापूर्वी दोन सामने जिंकले होते, पहिल्या सामन्यात श्रीलंकेला आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला हरवले होते. दोन्ही आशियाई संघ होते, परंतु आता या पराभवामुळे टीम इंडियाचा ताण वाढला आहे, कारण टीमचे चार सामने बाकी आहेत, पण पुढील तीन सामने मोठ्या संघांविरुद्ध आहेत. भारताचा पुढचा सामना स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. त्यानंतर त्यांचा सामना इंग्लंड आणि नंतर न्यूझीलंडशी आहे. शेवटी बांगलादेश महिला संघाशी भिडणार आहे. त्यामध्ये टीम इंडिया तीन तरी सामने जिंकावे लागतील. सध्या, टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.