कोलकाता कसोटीत भारताचा पराभव; आता WTCच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी काय करावे लागणार? संपूर्ण गणित
टीम इंडिया WTC 2027 अंतिम पात्रता परिस्थिती : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर भारताच्या 2027 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025-27 Points Table) स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आत्तापर्यंत भारताने तीनपैकी फक्त एकच मालिका जिंकली आहे. कोलकात्यात मिळालेल्या पराभवामुळे ही मालिका भारत जिंकू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.
भारताने 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रातील जवळपास अर्धा प्रवास पूर्ण केला आहे, पण या काळात टीम इंडियाला फक्त एकच मालिका जिंकता आली. भारताने वेस्ट इंडिजला 2-0 ने हरवले, तर इंग्लंडविरुद्धच्या परदेशातील मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यात यश मिळाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या गुणतालिकेत भारत आठ सामने खेळून चार विजय आणि तीन पराभवांसह चौथ्या क्रमांकावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा विजय टक्का 54.17 आहे.
भारत WTC 2025-27 च्या अंतिम फेरीत कसा पोहोचू शकेल?
भारताकडे अजून 10 सामने बाकी आहेत. यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटीतील दुसरी कसोटीही समाविष्ट आहे. पुढील वर्षी भारत श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन-दोन सामन्यांच्या मालिका खेळेल. शेवटी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची बॉर्डर-गावसरकर मालिका खेळून भारत मोहीमेचा शेवट करेल. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताने उर्वरित मालिकांमध्ये जास्तीत जास्त विजय मिळवणे अत्यावश्यक आहे. इतर संघांचे निकाल कसोटी गाठ ठरवतील, तरी सध्या त्यावर अवलंबून गणित लावणे योग्य नाही कारण सर्व संघ अजून शर्यतीत आहेत.
भारताला काय करावे लागणार? संपूर्ण गणित
गेल्या तीन आवृत्त्यांकडे पाहता, फायनलमध्ये क्वालीफाय होण्यासाठी साधारणपणे 65% पेक्षा जास्त विजय टक्का आवश्यक ठरतो. एकदा मात्र (2023 मध्ये) भारत 58.8% टक्क्यांसह फायनलमध्ये पोहोचला होता, पण बहुतेक वेळा संघांनी 65% पेक्षा जास्त कामगिरी केल्यावरच फायनल गाठले आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताचा विजय टक्का 65% पेक्षा जास्त ठेवणे अनिवार्य आहे. भारताने उर्वरित 10 सामन्यांपैकी किमान आठ सामने जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
वेगवेगळ्या परिस्थितीत भारताचा विजय टक्का असा दिसेल?
6 विजय + 4 बरोबरी = 68.52% – (फायनलची दारं जवळजवळ उघडी)
7 विजय + 2 पराभव + 1 बरोबरी = 64.81% – (धोक्याची स्थिती)
6 विजय + 3 पराभव + 1 बरोबरी = 60% च्या खाली – (फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता फारच कमी).
म्हणूनच भारतीय संघाला उर्वरित मालिकांमध्ये किमान तीनपेक्षा जास्त मालिका जिंकणे अत्यंत गरजेचे आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.