हस्तांदोलन वाद अन् गोळीबार सेलिब्रेशननंतर आता पुन्हा फायनलमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान; जाणून घ्
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: आशिया कप 2025 चा सतरावा हंगाम एकूण 8 संघांसह सुरू झाला होता. मात्र आता फक्त 4 संघ शर्यतीत कायम असून 4 संघ बाहेर पडले आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांमध्ये अजूनही स्पर्धा सुरू आहे. मागील दोन रविवारी भारत-पाकिस्तान सामने झाले असून, पुन्हा एकदा या दोन्ही संघांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला 8 संघांना 4-4 अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आली होती. प्रत्येक संघाने आपल्या गटातील उर्वरित 3 संघांविरुद्ध 1-1 सामना खेळला. त्यानंतर गटातील पहिल्या दोन संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश केला. गट अ मधून भारत आणि पाकिस्तान तर गट ब मधून श्रीलंका आणि बांग्लादेश पुढे आले. पाकिस्तानला फक्त भारतकडून पराभव पत्करावा लागला, तर टीम इंडियाने तिन्ही सामने जिंकले.
आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2025 मध्ये 2 सामने झाले आहेत. गट फेरी आणि सुपर-4 या दोन्ही टप्प्यांतील लढतीत भारताने विजय मिळवला आहे. आता पुन्हा एकदा हे प्रतिस्पर्धी आमनेसामने येऊ शकतात.
सुपर-4 मधील गुणतालिका
भारत आणि बांगलादेशने 1-1 विजय मिळवला असून दोघांचेही 2-2 गुण आहेत. नेट रन रेटच्या आधारावर भारत (0.689) अव्वल स्थानी आहे, तर बांगलादेश (0.121) दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंका (-0.121) तिसऱ्या आणि पाकिस्तान (-0.689) चौथ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांना सुपर-4 मध्ये आपला पहिला सामना गमवावा लागला.
आता पुन्हा फायनलमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान; जाणून घ्या समीकरण
सुपर-4 मध्ये प्रत्येक संघ इतर तिन्ही संघांविरुद्ध एक-एक सामना खेळणार आहे. एकूण 6 सामन्यांनंतर गुणतालिकेतील पहिल्या दोन संघांमध्ये अंतिम सामना होईल. भारताचे अंतिम फेरीत जाणे जवळपास निश्चित झाले आहे. पाकिस्तानलाही संधी आहे, पण त्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अत्यावश्यक आहे.
भारताने आपला पहिला सामना जिंकला असून त्यांचा पुढचा सामना 24 सप्टेंबरला बांग्लादेशविरुद्ध आहे. भारताने हा सामना जिंकला तर पाकिस्तानची फायनलमध्ये जाण्याची वाट सोपी होईल. पाकिस्तानचा पुढचा सामना 23 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि त्यानंतर 25 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध आहे.
कधी आहे आशिया कप 2025 चा फायनलचा सामना?
आशिया कप 2025 चा अंतिम सामना रविवार, 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. जर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत भिडले, तर सलग तिसऱ्या रविवारी या दोन प्रतिस्पर्ध्यांचा सामना पाहायला मिळेल. पण या वेळचा सामना मागील दोन्हीपेक्षा अधिक मोठा आणि निर्णायक ठरणार आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.