‘कुत्र्याचं मीट खाल्लंय, म्हणूनच भुंकतोय…’ इरफान पठाननं शाहिद अफरीदीला फ्लाइटमध्येच सुनावलं,

इरफान पठाण आणि शाहिद आफ्रिदी फ्लाइट स्टोरीमध्ये लढा देतात : टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर इरफान पठान सध्या सोशल मीडियावर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बेधडक स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं एक जुना किस्सा उघड केला, जेव्हा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद अफरीदी याच्यासोबत फ्लाइटमध्ये त्याचं जोरदार खटकलं होतं. पठानच्या एका टोला ऐकून अफरीदी पूर्ण प्रवासात गप्प झाला होता.

वाद नेमका का पेटला?

एका मुलाखतीदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने शाहिद आफ्रिदीसोबतच्या त्याच्या वादाबद्दल सांगितले. इरफानने शाहिद आफ्रिदीला असभ्य व्यक्ती म्हटले. तो म्हणाला की, मी माझ्या कारकिर्दीत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला 11 वेळा बाद केले आहे.

एका मुलाखतीदरम्यान शाहिद आफ्रिदी म्हणाला होता की, मी खरा पठाण आहे, इरफान नाही. यावर इरफान पठाण म्हणाला, “मला वाटले की तो फक्त माझ्याबद्दलच नाही तर माझ्या पालकांबद्दल बोलत आहे. जर आफ्रिदीने हे सर्व सांगितले नसते तर मला कोणतीही अडचण आली नसती, परंतु वैयक्तिक पातळीवर बोलणे चुकीचे होते. म्हणूनच मी त्याला योग्य उत्तर देखील दिले”.

2006 चा पाकिस्तान दौरा – फ्लाइटमध्ये खटकलं

इरफान पठाननं अलीकडेच लल्लंटॉपला मुलाखत दिली. त्याने ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 2006 मध्ये भारत पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. कराचीहून लाहोरला जाण्यासाठी दोन्ही संघांना एकच फ्लाइट मिळाली होती. सर्व खेळाडू एकत्र प्रवास करत असताना त्यात अफरीदीनं मजेत पठानचे केस बिघडवले आणि त्याला “बच्चा” म्हणून हिणवलं. ही गोष्ट इरफानला अजिबात भावली नाही. त्यानं लगेच प्रत्युत्तर दिलं – “तू कधीपासून माझा बाप झालास?” हे ऐकून अफरीदी भडकला आणि त्यानं गाल्यागालौज सुरू केली.

“डॉग मीट खाल्लंय म्हणूनच भुंकतोय…”

यानंतर पठाननं किस्सा रंगवला. फ्लाइटमध्येच तो पाकिस्तानचा ऑलराउंडर अब्दुल रज्जाक याच्याशी बोलू लागला. गंमतीगंमतीत त्यानं विचारलं, “पाकिस्तानमध्ये कसलं मटण मिळतं?” रज्जाकनं वेगवेगळ्या मांसाबद्दल सांगितलं. त्यावर पठाननं अफरीदीकडे पाहत चपखल टोमणा मारला, “इथे डॉग मीटही मिळतं का? बहुतेक अफरीदीनं खाल्लंय, म्हणून सतत भुंकतोय!”

आफ्रिडीची बोलताना बंद

इरफानच्या या एका वाक्यानंतर अफरीदी संपूर्ण प्रवासभर शांत बसला. पठान हसत म्हणाला की, “त्याला कळलं होतं की माझ्याशी बोलण्यात तो जिंकणार नाही. त्यानंतर त्यानं मला कधीच काही बोलायचं धाडस केलं नाही.”

हे ही वाचा –

Team India Squad For Asia Cup 2025 : उपकर्णधारपद तर विसरा, शुभमन गिल संघातूनच बाहेर? आशिया कपआधी खळबळ उडवून देणार अपडेट

आणखी वाचा

Comments are closed.