Raksha Bandhan : भावाला राखी बांधताना धाग्याला किती गाठी बांधाव्यात?

भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधनाचा सण (Raksha Bandhan 2025). दोघांमधील अतुट नात्यांच्या हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची, समृद्धीची कामना करते. यंदा हा सण शनिवार 9 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. तसं पाहायला गेलं तर रक्षाबंधनाशी संबंधित अनेक परंपरा आणि श्रद्धा आहे. ज्या बहिणी विशेष लक्ष देऊन पाळतात. पण, तरीही भावाला राखी बांधताना धाग्याला किती गाठी माराव्यात हे कित्येकजणींना ठाऊक नसते, जाणून घेऊयात याविषयी सविस्तरपणे

किती गाठी माराव्यात?

राखी सुटू नये यासाठी धाग्याला हव्या तितक्या गाठी मारल्या जातात. खरं तर, राखी बांधताना धाग्याला तीन गाठी मारणे शुभ मानले जाते. या तीन गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो. या तीन गाठी ब्रम्हा, विष्णू, महेशाला स्मरून बांधल्या जातात. जे त्रिदेव जगाचा सांभाळ करतात त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे, अशी बहिणीची यामागे कामना असते.

दुसरं म्हणजे या तीन गाठींचा अर्थ भावा-बहिणीच्या पवित्र ऋणानुबंधांशी जोडण्यात आला आहे.

पहिली गाठ –

भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी

दुसरी गाठ –

बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि शांतीसाठी

तिसरी गाठ –

भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम वाढवण्यासाठी बांधली जाते, असे सांगण्यात येते.

शुभ मुहूर्त कधी?

पंचांगानुसार, या दिवशी दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त असेल. कारण अनेकदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ असतो. या काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. यंदा मात्र या दिवशी भद्रा काळ नाही यामुळे दिवसभरात कधीही तुम्ही राखी बांधू शकता. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 05:21 ते दुपारी 01:24 पर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ काळ असे. मात्र ही वेळ साध्य न झाल्यास तुम्ही दिवसभरात कधीही राखी बांधू शकता.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=hehyhhf4tn2u

Comments are closed.