आयसीसी वनडे रँकिंग टॉप 5 मध्ये भारत-ऑस्ट्रेलियाचे किती खेळाडू? पहा संपूर्ण यादी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिक 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ बुधवारी (15 ऑक्टोबर ) रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माऐवजी शुबमन गिलला नियुक्त केले गेले आहे आणि संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर असेल. कसोटी आणि टी20 पासून निवृत्ती घेतलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताच्या वनडे संघाचा भाग आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्हीही खूप मजबूत संघ आहेत. या दोन्ही देशांमध्ये भारतीय संघातील अनेक खेळाडू आयसीसी रँकिंगमध्ये टॉप 5 मध्ये स्थान मिळवलेले आहे.

आईसीसी बॅटिंग रँकिंगमध्ये भारताचा दबदबा कायम आहे. टॉप 5 यादीत एकही ऑस्ट्रेलियाचा खेळाडू समाविष्ट नाही. तर भारताचे तीन खेळाडू या यादीत आपले स्थान बनवले आहेत. आईसीसी बॅटिंग रँकिंगमध्ये टॉप 10 पर्यंत ऑस्ट्रेलियाचा एकही खेळाडू दिसत नाही. या यादीत टॉपवर भारताच्या वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल आहे. गिल 784 रेटिंग पॉइंट्ससह नंबर वन आहे.

आईसीसी बॉलिंग रँकिंगच्या टॉप 5 यादीत भारताचा एक खेळाडू समाविष्ट आहे. तर या यादीतही ऑस्ट्रेलियाचा एकही खेळाडू नाही. भारताचा कुलदीप यादव आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये 650 रेटिंग पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

आईसीसी मेन्स वनडे ऑलराउंडर रँकिंगमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही संघांचे कोणतेही खेळाडू समाविष्ट नाहीत. या यादीत टॉपवर अफगाणिस्तानचा खेळाडू अजमतुल्लाह उमरजई 334 रेटिंग पॉइंट्ससह नंबर वन आहे.

Comments are closed.