Asia Cup 2025: 41 वर्षांत भारताने किती वेळा जिंकला आशिया कप? पहा एका क्लिकवरती

Asia Cup: आशिया कप आता आपल्या अंतिम टप्प्यात आहे. 2 दिवसात याचा फायनल सामना होणार आहे. आशिया कपची 17वी आवृत्ती 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे खेळला जात आहे. 2025 आशिया कपचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकॉंग यांच्यात झाला होता. तर या स्पर्धेचा फाइनल सामना (28 सप्टेंबर) रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.

इतिहासात पहिल्यांदाच एशिया कपमध्ये 8 संघांनी भाग घेतला. या वेळी भारत, पाकिस्तान, ओमान, यूएई, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकॉंग या संघांचा यात समावेश होता. भारताने आशिया कपमध्ये सर्वाधिक 8 वेळा विजेतेपद जिंकले आहे. शेवटचा एशिया कप 2023 मध्ये वनडे फॉरमॅटमध्ये झाला होता, ज्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 10 विकेटने हरवले होते.

आशिया कपमध्ये भारत सर्वाधिक 8 वेळा चँपियन ठरला आहे आणि हा टूर्नामेंटमधील सर्वात यशस्वी संघ आहे. भारत आशिया कपमध्ये 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 मध्ये विजेता ठरला आहे. आशिया कपमधील दुसरा सर्वात यशस्वी संघ श्रीलंका आहे. त्यांनी ही टूर्नामेंट 6 वेळा जिंकली आहे. श्रीलंका संघ आशिया कप 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 मध्ये चँपियन ठरला आहे.

पाकिस्तानने आशिया कप फक्त 2 वेळा जिंकला आहे. त्यांनी ही टूर्नामेंट 2000 आणि 2012 मध्ये जिंकली होती. बांगलादेशने 3 वेळा आशिया कपची फाइनल खेळली आहे, पण तिन्ही फाइनलमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

आशिया कपचे आयोजन 41 वर्षांपूर्वी केले गेले होते. हा टूर्नामेंट आतापर्यंत 16 वेळा पार पडला आहे, ज्यापैकी 14 वेळा वनडे फॉरमॅट आणि 2 वेळा टी20 फॉरमॅट मध्ये खेळला गेला आहे. आशिया कप पहिल्यांदाच 1984 मध्ये संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे वनडे फॉरमॅटमध्ये खेळला गेला होता, ज्यात भारतीय संघाने फाइनलमध्ये श्रीलंका पराभूत करून आशिया कपचा पहिला चँपियन संघ ठरला होता. तर 1986 मध्ये या टूर्नामेंटच्या दुसऱ्या आवृत्तीत श्रीलंकेने फाइनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करून ट्रॉफी आपल्याकडे आणली होती. तेव्हापासून ही टूर्नामेंट आशियाई क्रिकेटमधील प्रमुख स्पर्धांपैकी एक बनली आहे.

Comments are closed.