आयपीएलमध्ये अंपायरिंगसाठी किती पैसे मिळतात? पाहा कमाईचे संपूर्ण गणित

आयपीएल स्पर्धेचा 19 वा हंगाम आता जवळ आला आहे. 28 मार्च रोजी पहिला सामना खेळवला जाईल. बंगळुरूमध्ये आरसीबी आणि एसआरएच (RCB vs SRH) हे संघ आमनेसामने असतील. सर्वांच्या नजरा जगभरातील खेळाडूंवर असतील. तत्पूर्वी कोणत्याही सामन्यात अंपायरची भूमिका खूप महत्त्वाची असते. आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे, पण अंपायरला काय मिळते, हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे.
इंडियन प्रीमियर लीग असो किंवा इतर कोणताही सामना, तुम्ही पाहिले असेल की एका सामन्यात अनेक अंपायर्स असतात. काही अंपायर्स मैदानावर असतात, तर मैदाबाहेर बसलेल्या अंपायरची भूमिकाही खूप महत्त्वाची असते. अनेक निर्णयांवर अंतिम शिक्का मैदाबाहेर बसलेला अंपायरच मारतो. मात्र त्यांना मिळणाऱ्या एका दिवसाच्या पगारात फरक असतो. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल सामन्यात जे अंपायर्स मैदानावर असतात, त्यांना एका सामन्याचे तीन लाख रुपये दिले जातात. तर फोर्थ अंपायर, म्हणजेच जे मैदानाबाहेर असतात, त्यांना दोन लाख रुपये दिले जातात. ही एक संभाव्य रक्कम आहे. हे आकडे सांगत आहोत, ते प्रति सामन्याच्या हिशोबाने आहेत.
दररोज कोणताही अंपायर मैदानावर नसतो, मधून मधून त्यांनाही खेळाडूंप्रमाणे विश्रांती दिली जाते. तुम्हाला हे देखील माहीत असावे की सामन्यासाठी तर त्यांना ही रक्कम दिली जातेच, पण जे एलीट पॅनलचे अंपायर्स असतात, त्यांना संपूर्ण सीझनसाठी सुमारे सात लाख रुपये वेगळे दिले जातात. जे ‘रिटेनर’ म्हणून मिळतात. याशिवाय अंपायर्सना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 12 हजार रुपये वेगळा भत्ता देखील दिला जातो.
यामध्ये एलीट पॅनल असते. तर हे आयसीसी (ICC) कडून ठरवले जाते. जसा एखादा खेळाडू आधी डोमेस्टिक क्रिकेट खेळतो, जर त्याने चांगली कामगिरी केली तर त्याला इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्याची संधी मिळते, साधारण असेच काहीसे अंपायर्सच्या बाबतीतही घडते. आयसीसी जगातील टॉप 10 ते 12 अंपायर्सना एलीट पॅनलमध्ये सामील करते. एलीट पॅनलमध्ये असण्याचे स्वतःचे अनेक फायदे आहेत. सामन्यासाठी जे मॅच फीस मिळते, त्याव्यतिरिक्त एलीट पॅनलवाल्यांना वेगळी रक्कम देखील दिली जाते. हे संभाव्य आकडे आहेत रिपोर्टनुसार त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.