ड्रीम 11 मुळे बीसीसीआयला किती होणार नुकसान? आशिया कपपूर्वी वाढली चिंता
केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत ऑनलाइन गेमिंग बिल पास करून दिले आहे. या विधेयकानंतर आता ऑनलाइन पैसे कमावणाऱ्या गेमवर बंदी लागणार आहे. यामुळे ड्रीम 11 सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे.
साल 2023 मध्ये ड्रीम 11 पहिल्यांदाच बीसीसीआयची अधिकृत स्पॉन्सर बनली होती. ही डील 358 कोटी रुपयांची होती आणि तीन वर्षांसाठी होती, म्हणजे मार्च 2026 पर्यंत लागू होती. पण आता ऑनलाइन मनी गेम भारतात बंद झाल्यामुळे परिस्थिती बदलली आहे.
एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, ड्रीम 11 ने बीसीसीआयसोबतची स्पॉन्सरशिप डील तत्काळ रद्द केली आहे, कारण ऑनलाइन गेमिंग बिलामुळे कंपनीला मोठा आर्थिक नुकसान झाला आहे.
बीसीसीआय आणि ड्रीम 11 यातील ही डील आता 1 वर्षाहून कमी कालावधीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे 358 कोटींपैकी अर्ध्याहून अधिक रक्कम बीसीसीआयला मिळालेली आहे. पण जर ड्रीम 11 ही डील अचानक रद्द करत असेल, तर बीसीआयला नुकसान होऊ शकते, कारण बोर्डसाठी नवीन स्पॉन्सर शोधणे सोपे जाणार नाही.
Comments are closed.