ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श किती संपत्तीचा मालक? जाणून घ्या त्याची एकूण नेटवर्थ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने शानदार खेळी केली. मार्शने केवळ 52 चेंडूंमध्ये नाबाद 46 धावा करत ऑस्ट्रेलियाला (DLS पद्धतीने) 7 गडी राखून विजय मिळवून दिला. या उत्कृष्ट खेळीसाठी त्याला सामनावीर (Player of the Match) म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मिचेल मार्श सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या व्हाईट बॉल फॉरमॅटचा कर्णधार मिचेल मार्शने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मोठं नाव कमावलं आहे. मार्शच्या अंदाजे एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ती सुमारे 5 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 28.35 कोटी रुपये आहे. त्याच्या कमाईचे प्रमुख स्रोत म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट, बिग बॅश लीग, आयपीएल आणि इतर टी-20 लीगमधील करार, तसेच ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणूक हे आहेत.
मिचेल मार्श क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डकडून सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत दरवर्षी सुमारे 5 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 2.6 कोटी रुपयांची कमाई करतात. याशिवाय, मार्शला राष्ट्रीय संघासाठी खेळल्याबद्दल स्वतंत्र मॅच फी मिळते. टेस्ट सामन्यासाठी त्यांना 20,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 1.05 लाख रुपये), वनडे सामन्यासाठी 15,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 79 हजार रुपये) आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 10,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 53 हजार रुपये) प्रति सामना मिळतात. मार्श आयपीएलमधूनही मोठी कमाई करतात आणि 2025 च्या आयपीएल हंगामासाठी लखनौ सुपर जायंट्सने त्यांना तब्बल 3.4 कोटी रुपयांचा करार दिला होता.
मिचेल मार्श अनेक ब्रँडचे जाहिराती करतात, ज्यातून त्यांची चांगली कमाई होते. मार्श ग्रे निकोल्स, प्यूमा आणि स्ट्रीट एक्स यांसारख्या ब्रँडचे जाहिरातदार आहेत. या जाहिरातींतून मार्श दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. या अफाट कमाईमुळे मार्श अतिशय आलिशान जीवनशैली जगतात. ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात त्यांचं एक भव्य घर आहे आणि त्यांच्या गॅरेजमध्ये अनेक लक्झरी कार्सचा समावेश आहे.
Comments are closed.