Immunity Power : रोगप्रतिकारकशक्ती वाढवा, संसर्गापासून दूर राहा

जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोविड 19ची काही प्रकरणे हॉंगकॉंग, सिंगापूर आणि थायलंड या देशांमध्ये आढळली आहेत. आता भारतातही कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सर्वचजण चिंतेत आहेत. बदलत्या वातावरणात होणाऱ्या सर्दी-खोकल्यालानेही अनेकांची घाबरगुंडी उडत आहे. उष्ण हवामानाचे रूपांतर अचानक दमट वातावरणात झाल्याने अनेक संसर्गजन्य आजार डोके वर काढत आहेत. अशावेळी स्वत:ची काळजी घेण्यासाठी, विविध संसर्गजन्य आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही सोपे उपाय

आहार –

आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, प्रोटीन आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करावा. जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी युक्त आहार घ्यावा. व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी आंबट फळे तुम्ही खाऊ शकता. याशिवाय कोणते पदार्थ खाता येतील पाहूयात,

हळदीचे दुध – हळदीत ऍटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

आले – आले देखील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

दही दह्यात प्रोबायोटिक्स असतात, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.

ग्रीन टी – ऍटी-ऑक्सिडंट्सने परिपूर्ण अशी ग्रीन टी असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असते.

पालक – व्हिटॅमिन ए, सी आणि ई पालकात आढळतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

ब्रोकोली – ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, ऍटी-ऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

मशरूम – रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मशरूम एक उत्तम पर्याय आहे.

ग्रीन किंवा ब्लॅक टी – ग्रीन किंवा ब्लॅक टी मुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे सकाळची सुरूवात ग्रीन किंवा ब्लॅक टी ने करू शकता.

व्यायाम –

दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा. तुम्ही योगा, चालणे, धावणे किंवा सायकलिंग करू शकता.

झोप –

दररोज 7 ते 8 तासांची झोप न चुकता घ्या. कारण झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते.

ताणापासून दूर राहा –

ताणामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे ताणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही दिवसातील काही वेळ योगा, ध्यान आणि संगीत यासारख्या ऍक्टिव्हिटी करू शकता.

धूम्रपान आणि मद्यपान टाळा –

धूम्रपान आणि मद्यपान केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. यासह फुफ्फुसाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे धूम्रपानापासून दूर राहणे फायद्याचे आहे.

हसत राहा –

हसणे हा प्रत्येक समस्येवर आणि आजारावरील एक सोपा उपाय आहे. त्यामुळे कायम हसत राहा.

 

 

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.