कर्ज लवकर मंजूर करुन घ्यायचं असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे पर्याय
नवी दिल्ली : सध्या घर खरेदी करायचं असेल किंवा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. याशिवाय आर्थिक अडचण आल्यास वैयक्तिक कर्ज देखील काढावं लागतं. बँका कर्ज देताना कर्जदाराचं आर्थिक उत्पन्न आणि त्याचा क्रेडिट स्कोअर पाहतात. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँका किंवा वित्तीय संस्था कर्ज लवकर मंजूर करतात. चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळं कर्ज लवकर मिळू शकतं, त्याचबरोबर कमी व्याज दरावर कर्ज मिळू शकतं.
How To Improve Credit Score : क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा?
क्रेडिट स्कोअर हे एका प्रकारचं रेटिंग आहे. ज्यामध्ये तुमचं कर्ज आणि ईएमआय भरण्यामध्ये किती प्रामाणिक आहात ते दाखवतं. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 दरम्यान असतो. क्रेडिट स्कोअरमध्ये क्रेडिट इतिहास, कर्ज परतफेड रेकॉर्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर आणि त्याचं पेमेंट या गोष्टींचा समावेश असतो.
300 ते 579 या दरम्यान क्रेडिट स्कोअर कमी असल्यास बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज देण्याबाबत विचार करु शकते. 580-699 दरम्यान स्कोअर असल्यास तो सरारसरी स्कोअर मानला जातो. या रेंजमध्ये असलेल्या कर्जदाराला कर्ज मिळू शकतं. मात्र, व्याज दर अधिक असेल. 700-749 दरम्यान क्रेडिट स्कोअर असल्यास चांगला स्कोअर मानला जाईल.यामुळं आकर्षक व्याज दर आणि लगेचच कर्ज मंजूर होईल. 750-900 दरम्यान क्रेडिट स्कोअर असेल तर बँक आणि एनबीएफसी आकर्षक अटींवर कर्ज देईल.
क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास कर्ज मंजूर होण्यात मदत होते. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास त्याचा अर्थ बँक आणि वित्तीय संस्थांचा कर्जदारावर विश्वास आहे, असा असतो. कमी व्याज दरावर कर्ज मिळतं ज्यामुळं ईएमआय देखील कमी होतो. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढते. बँका अधिक मर्यादेची क्रेडिट कार्ड सहजपणे देऊ शकतात. वेगवेगळी कर्ज काढण्यासाठी फायदेशीर गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर चांगला असणं आवश्यक असतं.
क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा?
एखादं कर्ज घेतलं असल्यास ईएमआय वेळेवर भरा. एखादा ईएमआय भरण्यास उशीर झाल्यास क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. क्रेडिट मर्यादेचा योग्य वापर करा. क्रेडिट लिमिट असेल त्याच्या 30 टक्के मर्यादेचा वापर केला पाहिजे. पूर्ण मर्यादेचा वापर केल्यास क्रेडिट स्कोअर घटू शकतो. वारंवार कर्जासाठी अर्ज करु नका, याचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. नियमित क्रेडिट स्कोअर तपासा, एखाद्या वेळी रिपोर्टमध्ये चूक आढळल्यास त्यात सुधारणा करता येऊ शकते. मोबाईल किंवा वीज बिल याचं बिल भरण्यासाठी बँकेचा किंवा कार्डचा वापर केल्यास क्रेडिट हिस्ट्री चांगली होते.
क्रेडिट स्कोअर कर्जदाराच्या वित्तीय वर्तन कसं आहे ते दाखवतं. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्जाला लवकर मंजुरी मिळते आणि ईएमआय देखील कमी असतो. तुमचं वित्तीय भविष्य सुरक्षित करतं. यासाठी वेळेवर परतफेड करा. क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा. काही गोष्टींचं नियमित पालन केल्यास क्रेडिट स्कोअर चांगला राहू शकतो.
आणखी वाचा
Comments are closed.