क्रेडिट स्कोअर कमी होत असल्यास कसा वाढवावा? जाणून घ्या पर्याय
नवी दिल्ली : क्रेडिट स्कोअर आजकाल कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना महत्त्वाची भूमिका बजावतो. वित्तीय संस्था किंवा बँकांकडून क्रेडिट स्कोअर तपासून त्याआधारे कर्ज वितरण करण्यासंदर्भात निर्णय घेतला जातो. मात्र, क्रेडिट स्कोअर कमी झाल्यानं अनेक जण नाराज होतात. जे लोक वित्तीय शिस्त पाळत असतात त्यांना क्रेडिट स्कोअर घटल्यास त्रास होतो. कारण कर्ज घेताना किंवा क्रेडिट कार्ड घेताना अडचणी निर्माण होतात.
क्रेडिट स्कोअर कमी होण्याची कारणं सोप्या पद्धतीनं ओळखता येतात. त्यावर मार्ग काढून त्यात वाढ करता येते. क्रेडिट स्कोअर कमी होण्याचं प्रमुख कारण कर्जाच्या हप्त्याची किंवा क्रेडिट कार्डच्या पेमेंटची वेळेत परतफेड न करणं याचा स्कोअरवर परिणाम होतो. समजा तुम्ही कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचं बिल वेळेत भरु शकला नाही त्याचा स्कोअरवर वाईट परिणाम होतो. एक हप्ता थकला तरी त्यामुळं स्कोअर घटतो.
जुनी क्रेडिट कार्ड बंद केल्यास स्कोअर वाढण्यास फायदा होईल असं वाटतं. मात्र, क्रेडिट लिमीट कमी होते त्यामुळं क्रेडिट स्कोअर कमी होतो. तुम्ही क्रेडिट लिमिटच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक खर्च करत असला तर तुम्ही क्रेडिटवर किंवा कर्जावर अवलंबून आहात हे दिसून येतं. क्रेडिट कार्डच्या लिमिटच्या 30 टक्के खर्च केल्यास स्कोअर व्यवस्थित राहतो.
क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी तुमचे हप्ते वेळेवर भरा. क्रेडिट कार्ड बिल आणि ईएमआय वेळेत भरात. यामुळं क्रेडिट स्कोअर वाढेल. क्रेडिट कार्डचा वार मर्यादित करा. म्हणजेच तुमची क्रेडिट लिमीट 3 लाख रुपये असेल तर 1 लाख रुपये वापरा. नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज कताना काळजी घ्या.कर्ज दाते तुम्हाला कर्ज देताना तुमची क्रेडिट हिस्टरी पाहतात. अनेकदा क्रेडिट स्कोअर चेक केल्यास तो कमी होतो.कर्ज आवश्यकता असेल तेव्हाच अर्ज करा.
क्रेडिट स्कोअर हे तुमचं वित्तीय रिपोर्ट कार्ड आहे. तो कमी होणं हे अलार्मिंग आहे. शिस्तबद्ध पद्धतीनं वेळेवर ईएमआय भरल्यास, कर्ज योग्य पद्धतीनं घेतल्या, क्रेडिट स्कोअर वाढेल.
आणखी वाचा
Comments are closed.