Monsoon Tips: पावसाळ्यात कांदे बटाटे सडायची भीती दूर, वापरा या ट्रिक्स

पावसाळा आला की घरामध्ये आर्द्रता वाढते, हवेत दमटपणा निर्माण होतो आणि त्याचा परिणाम होतो कांदा व बटाटा यांच्यावर. थोडीही ओल असल्यास हे पदार्थ पटकन सडतात. याचा त्रास सामान्य गृहिणींपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच होतो. पण जर काही सोप्या पारंपरिक ट्रिक्स वापरल्या, तर ही भाज्यांची साठवण चार ते सहा महिने टिकवता येऊ शकते. चला तर पाहूया या प्रभावी घरगुती उपायांची माहिती. (how to store onions and potato in monsoon)

पावसाळ्यात कांदा-बटाट्याची साठवणूक कशी कराल?

1) ओलसर कांदे-बटाटे साठवू नका असतील तर ते लवकर वापरा चांगल्या असलेल्या कांदे बटाट्यांसोबत ठेऊ नका.

2) बाजारातून आणल्यावर जर कांदा किंवा बटाटा ओला वाटत असेल तर सर्वप्रथम त्यांना कोरड्या कपड्यावर सुकवा. ओलेपणामुळे सडण्याची शक्यता अधिक असते.

3) बांबूची टोपली वापरा, प्लास्टिक नाही

4) कांदे प्लास्टिक पिशवीत साठवल्यास हवा खेळती राहत नाही आणि त्यामुळे ते पटकन खराब होतात. त्यामुळे बांबूच्या टोपलीत खुल्या जागी ठेवा.

5) सागवान किंवा इतर कोरडी पाने वापरा

6) पारंपरिक पद्धतीप्रमाणे कांदा-बटाटा गवतावर ठेवून, त्यावर सागवानची पाने पसरवा. या पानांमुळे ओलावा शोषला जातो.

7) बटाटा आणि कांदा वेगळे ठेवा

8) कधीही हे दोन एकत्र साठवू नका. दोघांचे नैसर्गिक गुणधर्म वेगळे असतात. एकत्र ठेवल्यास दोघेही लवकर सडतात.

9) कांदे- बटाटे कोरड्या जागेत ठेवा आणि जेव्हा -जेव्हा शक्य असेल तेव्हा तपासा.

10) साठवणूक करण्याचे ठिकाण पूर्णपणे हवादार आणि कोरडे असावे. आठवड्यातून एकदा कांदा-बटाटे तपासा, सडलेले लगेच वेगळे करा.

फायदे:
– 4 ते 6 महिने टिकवता येतात
– वास कमी येतो
– घरगुती गरजेसाठी साठवणूक करणं शक्य होतं.

हेही वाचा: Kitchen Tips: पावसाळ्यात मिठाला पाणी सुटल्यास करा हे उपाय

Comments are closed.