ध्रुव राठीविरूद्ध मोठा राग

शीख गुरुंसंबंधी एआय व्हिडिओमुळे वाद : पोलिसांकडे तक्रार दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्रसिद्ध युट्यूबर ध्रूव राठी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी त्याने शिखांच्या भावना दुखाविल्याचा आरोप आहे. हरियाणाचा रहिवासी परंतु विदेशात राहत असलेल्या ध्रूवने ‘द राइज ऑफ शिख’ नावाने एआय जनरेटेड व्हिडिओ तयार करत तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे, यामुळे लोकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. पंजाबमध्ये ध्रूव विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शीख समुदाय याला शीख धर्मगुरुचा अपमान ठरवत अताहेत. लोकांनी या कृत्याकरता ध्रूव विरोधात कारवाईची मागणी केली आहे.

ध्रूव राठीने तयार केलेला व्हिडिओ तथ्यात्मक स्वरुपात त्रुटीपूर्ण आहे, याचबरोबर शीख इतिहास आणि भावनांचा घोर अपमान करणारा आहे. ध्रूवने व्हिडिओद्वारे शीख धर्माच्या मूळ भावनेचा अपमान केला असल्याचा आरोप दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला.

याप्रकरणी ध्रूव विरोधता तक्रार नोंदविण्यात आली आहे. धार्मिक भावनांना ठेच पोहोचविणाऱ्या गुन्ह्यांमुळे त्याच्या युट्यूब अकौंटची समीक्षा करण्यास सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या या हस्तकाकडून पवित्र इतिहासासोबत छेडछाड करण्याच्या कृत्याला  शीख समुदाय समुदाय कधीच सहन करणार नसल्याचे वक्तव्य सिरसा यांनी केले.

Comments are closed.