शिव विधी व न्याय सेनेच्या कायदा जनजागृती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिव विधी व न्याय सेना, महाराष्ट्र राज्यच्या वतीने आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना नेते आमदार अॅड. अनिल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सामान्य नागरिकांना कायद्याविषयी व त्यांच्या हक्कांबाबत माहिती मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम शिवसेना शाखा क्र.83, अंधेरी पूर्व या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमात शिव विधी संघटनेच्या उपाध्यक्षा अॅड. स्वप्ना कोदे, सचिव अॅड. दर्शना जोगदनकर, अॅड. दिलीप कोकिळ यांनी उपस्थितांना विविध कायद्यांविषयी माहिती दिली. यावेळी अॅड. प्रिया चितवकर, विभाग संघटक रजनी मिस्त्राr, विधानसभा संघटक रूपाली शिंदे, विधानसभा समन्वयक मंगला शेलार, उपविभाग संघटक उर्मिला सावंत, नगरसेविका सोनाली साबे, समीर साबे, सुनील अडेलकर, स्नेहल महाडिक उपस्थित होते.

Comments are closed.