रोहित आर्या पवई ओलीस नाट्य : मानवाधिकार आयोगाने चौकशीसाठी नेमली समिती

बहुचर्चित रोहित आर्या एन्काऊंटरची मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी आयोगाने समिती नेमली आहे.
आयोगाचे अध्यक्ष ए. एम. बदर यांनी ही समिती नेमल्याचे आदेश सोमवारी जारी केले. आयोगाचे पोलीस महानिरीक्षक विश्वास पांढरे या चौकशीचे प्रमुख असतील. आयोगाचे रजिस्ट्रार व्ही. पी. केदार हे या समितीत असतील. समितीने या एन्काऊंटरची चौकशी करून त्याचा अहवाल आयोगासमोर सादर करावा, असे आदेश अध्यक्ष बदर यांनी दिले आहेत. राज्य शासनाने या चौकशी समितीला सहकार्य करावे, असेही अध्यक्ष बदर यांनी नमूद केले. यावरील पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. रोहितच्या छातीत गोळी झाडली गेल्याची खूण आहे. अपघाती मृत्यू अशी पवई पोलिसांनी नोंद केली आहे. याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.
गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना नोटीस
गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, महानगर दंडाधिकारी व मुंबई पोलीस आयुक्त यांना आयोगाने नोटीस जारी केली आहे. आठ आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने या प्रतिवादींना दिले आहेत
			
											
Comments are closed.