'अपमानित करून संघाबाहेर काढले..' दिनेश कार्तिकने रवि शास्त्रीबद्दल केला मोठा खुलासा!
ईस्ट इंडिजचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक निवृत्तीनंतरपासूनच कॉमेंट्री पॅनलमध्ये आहे. कार्तिक त्याच्या उत्तम कॉमेंट्रीमुळे चर्चेत राहतो. कार्तिक भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतही कॉमेंट्री करत आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने या सामन्याबद्दल बोलताना भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर मोठा खुलासा केला आहे. त्यानंतर असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की त्याचा अपमान करुन संघातून बाहेर काढण्यात आले का?
लॉर्ड्स कसोटी सामन्याची चर्चा सुरू होती. दरम्यान दिनेश कार्तिकने इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेनशी बोलताना म्हटले की, ‘माझ्यात आणि नास (नासिर हुसेन) मध्ये फारसे साम्य नाही आणि मी ते असेच ठेवू इच्छितो. पण दुःख या गोष्टीचे आहे की, त्याची कारकीर्द लॉर्ड्समध्ये संपली आणि माझी सुद्धा. फरक एवढाच की नास प्रशिक्षकाच्या दारात गेला आणि म्हणाला, ‘मला वाटत आहे की आता माझी वेळ संपली आहे.’ आणि माझा बाबतीत उलटे झाले. म्हणजेच, मलाच प्रशिक्षक येऊन म्हणाले की आता तुझी वेळ संपली आहे. पुढचा कसोटी मध्ये खेळू नको.’ दिनेश जेव्हा हे म्हणाला तेव्हा रवि शास्त्री त्याचा बाजूलाच बसले होते. 2018 मध्ये शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.
2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतर दिनेश कार्तिक टीम इंडियामध्ये परतला. त्यानंतर दुखापतीमुळे वृद्धिमान साहाची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. एजबॅस्टन कसोटी सामन्यात कार्तिकने 0 आणि 20 धावा केल्या आणि लॉर्ड्स कसोटी सामन्यात त्याने 1 आणि 0 धावा केल्या. त्यामुळे या लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर त्याला दुसरी संधी मिळाली नाही. 2018 च्या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये रिषभ पंतने पदार्पण केले. पंतच्या फलंदाजीने उत्तम खेळी झाल्या.
Comments are closed.