आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झालीय…धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांची भावूक पोस्ट
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रं यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत घालवलेले चांगल्या क्षणांची आठवण काढत धर्मेंद्र एक चांगला नवरा, वडिल, मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होता. धर्मेंद्र यांच्या जाण्याने आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी एक पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांच्यासोबतचे जुने फोटोही शेअर केले आहेत. हेमा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीले आहे की, ”धर्म जी माझ्यासाठी सर्वकाही होते. प्रेमळ नवरा, आमच्या दोन मुली ईशा आणि अहानाचे वडिल, मित्र, मार्गदर्शन आणि ती व्यक्ती ज्याच्याकडे मी कोणत्याही परिस्थितीत जाऊ शकत होती. ते माझ्यासाठी सर्वकाही होते. आम्ही चांगला आणि वाईट काळ एकत्र पाहिला. त्यांचा मनमोकळ्या आणि मैत्रीपूर्ण स्वाभावाने त्यांनी माझ्या कुटुंबातील सर्वांची मनं जिंकली होती. त्यांनी सर्वांना प्रेम दिले. त्यांच्या याच स्वभामुळे त्यांचे इतरांपेक्षा वेगळेपण उठून दिसते.
एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेनंतरही त्यांच्याकडे असलेल्या विनम्रतेने त्यांना इतर सर्व दिग्गजांमध्येही वेगळ्या उंचीवर नेले. चित्रपटसृष्टीतील त्यांची किर्ती आणि कर्तृत्व सदैव अमर राहील. त्यांच्या जाण्याने माझे जे नुकसान झाले आहे, ते मी शब्दात सांगू शकत नाही. जी पोकळी निर्माण झाली आहे, ती माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत असेल. आम्ही अनेक वर्षे एकत्र घालवली आहेत. त्यांच्या असंख्य आठवणी माझ्याबरोबर आहेत. ते खास क्षण मला जगण्यासाठी बळ देतील”, असे म्हणत हेमा मालिनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
धरम जी❤️
तो माझ्यासाठी अनेक गोष्टी होता. प्रेमळ पती, आम्हा दोन मुलींचे वडील, ईशा आणि आहाना, मित्र, तत्वज्ञानी, मार्गदर्शक, कवी, माझ्या प्रत्येक गरजेच्या वेळी 'जाऊ' व्यक्ती – खरं तर, तो माझ्यासाठी सर्वस्व होता! आणि नेहमीच चांगल्या आणि वाईट काळात गेले आहे. त्याने स्वत: ला प्रिय केले … pic.twitter.com/WVyncqlxK5— हेमा मालिनी (@dreamgirlhema) 27 नोव्हेंबर 2025
बॉलीवूडच्या ही मॅनने 89 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांच्या राहत्या घरीच त्यांच्यावर पुढील उपचार सुरू होते. मात्र सोमवारी 24नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
Comments are closed.