हैदराबाद-बंगलोर बसचे भाडे
आंध्रातील दुर्घटनेत 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू : खिडक्या तोडून काही प्रवाशांनी वाचविला जीव
मंडळे / हैदराबाद
हैदराबादहून बेंगळूरला जात असलेल्या आंध्र प्रदेश राज्याच्या बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा बळी गेला आहे. ही दुर्घटना शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या आसपास घडली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश दिला आहे. अनेक प्रवाशांनी बसच्या खिडक्या तोडून बाहेर पडण्यात यश मिळविले आणि स्वत:चा जीव वाचविला आहे. बसच्या दोन्ही चालकांचा जीव वाचला आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले.
ही बस रात्री 10 वाजता हैदराबादहून बेंगळूरला जाण्यासाठी निघाली होती. चार तासांच्या प्रवासानंतर ती आंध्र प्रदेशच्या सीमेत पोहचली. त्यानंतर अर्ध्या तासात कर्नूल जिल्ह्यातील चिन्नटेकूर खेड्यानजीक बस आल्यानंतर ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती अग्निशमन विभाग आणि आपत्ती निवारण केंद्राला देण्यात आली. त्यानंतर त्वरित प्रवाशांचे प्राण वाचविण्याचे आणि बसला लागलेली आग विझविण्याचे काम हाती घेण्यात आले. ग्रामस्थांनीही याकामी साहाय्य केले होते.
दुचाकीशी टक्कर
या बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. शुक्रवारी पहाटे या बसची एका दुचाकीशी टक्कर झाली. त्यानंतर बसला आग लागली. बसचा समोरचा दरवाजा जॅम झाल्याने प्रवाशांना त्वरित बसमधून बाहेर पडता आले नाही. काही मिनिटांमध्येच आगीच्या ज्वाळा बसच्या मागच्या भागापर्यंत पोहचल्या. यावेळी बसमधील बहुतेक सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. ज्वाळांमुळे काही प्रवाशांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करून इतर प्रवाशांना जागे केले. त्यानंतर प्रवाशांनी बसचा इमर्जन्सी दरवाजा फोडून बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा केला. अनेक प्रवाशांनी बसच्या मागच्या भागातील खिडक्यांच्या काचा तोडून बसबाहेर पडण्यात यश मिळविले. या प्रयत्नात काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 45 पैकी 20 ते 25 प्रवाशांनी स्वत:चा जीव वाचविला असून 20 प्रवासी मृत झाल्याची माहिती दिली गेली आहे.
आग लागण्यापूर्वी स्फोट
बसला आगीच्या ज्वाळांनी वेढण्यापूर्वी काही प्रवाशांना स्फोटाचा आवाज ऐकू आला होता. अनेक प्रत्यक्षदर्शींनी हा घटनाक्रम कथन केला आहे. हा स्फोट नेमका कशाचा होता, याची माहिती देण्यात आलेली नाही. पण आग लागण्यापूर्वी बस एका दुचाकीला आदळली होती, असेही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
11 मृतदेहांची पटली ओsळख
या अपघातातील 20 मृतांच्या मृतदेहांचे अवशेष हाती लागले आहेत. त्यांच्यापैकी 11 जणांची ओळख पटली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती कळविण्यात आली असून त्यांनी रुग्णालयांमध्ये गर्दी केली होती. अनेक मृतदेह ओळख पटण्याच्या पलीकडच्या स्थितीत असून त्यांच्या डीएनए परीक्षणावरून त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
अपघात की घातपात…
बसला आग लागण्यापूर्वी स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने या दुर्घटनेच्या कारणांविषयशी संशय निर्माण झाला आहे. हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेश सरकारने या दुर्घटनेचे अन्वेषण सर्व शक्यता गृहित धरुन करण्याचा आदेश दिला आहे. अन्वेषणानंतरच खरे कारण प्रकाशात येणार आहे. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसून येते. मात्र, हा निश्चित निष्कर्ष नसल्याचे आंध्र प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे. बसचा समोरचा दरवाजा उघडण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या वायर्स कापलेल्या स्थितीत आढळल्याने घातपाताच्या संशयाला पुष्टी मिळते, असेही अनेकांचे म्हणणे आहे. अन्वेषणाचा अहवाल त्वरित सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
सर्व शक्यतांची पडताळणी होणार
ड आंध्र प्रदेश सरकारकडून दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश. सर्व शक्यता गृहीत
ड बसमधील 25 प्रवाशांनी मागच्या काचा तोडून वाचविले स्वत:चे प्राण
ड आग लागल्यानंतर बसचा समोरचा दरवाजा अडकल्याने जीवितहानी अधिक
ड बसला आग लागण्यापूर्वी स्फोटांचे आवाज आल्याने घातपात शक्यता व्यक्त
Comments are closed.