DC vs SRH: पॅट कमिन्सने रचला इतिहास! 17 वर्षाच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार

आज (5 मे) यंदाच्या आयपीएलमधील 55वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात, हैदराबाद कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) असा पराक्रम केला जो यापूर्वी कोणताही कर्णधार करू शकला नव्हता.

हैदराबादसाठी करो या मरो सामन्यात, कमिन्सने संघाचे नेतृत्व आघाडीवर केले आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्याने दिल्लीला सुरुवातीला धक्के दिले. पॅट कमिन्सने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर करुण नायरची विकेट घेतली. त्यानंतर, त्याने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसची आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिषेक पोरेलची विकेट घेतली. हे तिन्ही झेल ईशान किशनने (Ishan Kishan) विकेटमागे घेतले. या 3 विकेटसह पॅट कमिन्सने इतिहास रचला.

पॅट कमिन्स हा आयपीएलच्या 17 वर्षांच्या आयपीएल इतिहासात पहिल्या पॉवरप्लेमध्ये 3 विकेट्स घेणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी कोणीही ही कामगिरी करू शकले नव्हते. यापूर्वी, पहिल्या पॉवरप्लेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा कर्णधार अक्षर पटेल (Axar Patel) होता, ज्याने या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (RCB) 10 धावांत 2 विकेट्स घेतल्या. कमिन्सने दिल्लीविरुद्ध 12 धावा देऊन 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

Comments are closed.