निवडणुकीत घोटाळा झाला, मीच ब्राझीलचा खरा नेता; अमेरिकेत पळून गेल्यानंतर फ्लावियो बोल्सोनारो यांचे वक्तव्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडून पराभव झाल्यानंतर फ्लावियो बोल्सोनारो यांनी देश सोडून अमेरिकेत पलायन केले आहे. अमेरिकेतील मियामी शहरात पोहोचल्यानंतर त्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप करत “मीच ब्राझीलचा खरा नेता आहे,” असा दावा केला आहे.

फ्लावियो बोल्सोनारो यांनी ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा आपला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश धुडकावून लावला आणि अमेरिकेत पळ काढला. त्यानंतर त्यांनी X वर जनतेला उद्देशून एक खुले पत्र पोस्ट केले. या पत्रात सुरुवातीला त्यांनी स्वतःला निर्वाचित राष्ट्राध्यक्ष, असे संबोधले होते, मात्र नंतर ती पोस्ट हटवून नव्या पत्रात स्वतःला ब्राझीलचा योग्य नेता (Rightful Leader) म्हटले आहे. “माझ्या ६ कोटी समर्थकांनी आणि संपूर्ण ब्राझीलने हे जाणून घ्यावे की मीच देशाचा नेता आहे,” असे ते या पत्रात म्हणाले. तसेच लुला दा सिल्वा आणि सर्वोच्च न्यायालयाने संगनमत करून मते चोरली आणि देशात हुकूमशाही प्रस्थापित केल्याचा आरोप त्यांनी केला, मात्र या निवडणुकीतील कथित घोटाळ्याचा कोणताही ठोस पुरावा त्यांना देता आलेला नाही.

आपण देशातून पळून गेलो नसून, स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला राजकीय छळापासून वाचवण्यासाठी आपण देश सोडला असल्याचे फ्लावियो यांनी म्हटले आहे. अमेरिकेत पोहोचण्यासाठी आणि व्हिसा मिळवण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिलेई यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Comments are closed.