‘मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्यासारखे बलिदान…’, संग्राम भंडारेंंच्या नथुराम गोडसे व्हा

संगमनेर : संगमनेर येथे झालेल्या कीर्तन कार्यक्रमादरम्यान कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे स्थानिकच नव्हे तर राज्याचेही राजकारण तापले आहे. या कार्यक्रमानंतर भंडारे यांनी व्हिडिओ व्हायरल करत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव घेत, “आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल” असा थेट इशारा त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. भंडारे यांच्या या विधानानंतर काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून विविध स्तरांतून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. यामुळे संगमनेरच्या राजकारणासोबतच राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि  धमकीवरती बाळसाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत थोरातांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत वारकरी संप्रदायाच्या मूल्यांवर भाष्य केले, तसेच राज्यातील राजकीय पातळीवर कडवट टीका केली. थोरात म्हणाले, “वारकरी संप्रदायात असताना काही पथ्य पाळली पाहिजेत. अशा व्यक्तींनी राजकीय भाष्य करू नये, कारण कोणाला ठेस लागेल असे वाक्य कोणी करता कामा नये. मात्र दुर्दैवाने हे पाळले जात नाही. राज्यघटनेत कुठेही कोणाला ठेच लागेल अशी वक्तव्ये नाहीत.”

घुलेवाडीतील घटनेचा उल्लेख करत थोरात म्हणाले, “त्या दिवशी नकारात्मक कीर्तन सुरू असल्याने त्याला विरोध करण्यात आला. त्यानंतर खोट्या केसेस करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. काही कीर्तनकार अशा प्रकारची उचकावणारी वक्तव्ये करतात. पोलिस दबावाखाली काम करत असल्याचेही दिसते.”तसेच ते म्हणाले, “मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्या सारखे बलिदान देण्याची वेळ आली, तर लोकशाहीसाठी ते बलिदान मिळण्यात मला आनंदच आहे.”

तुषार भोसलेवर थेट आरोप

थोरातांनी भाजप नेते तुषार भोसलेवर थेट आरोप करताना म्हटले, “वारकरी संप्रदायामध्ये आम्हीच अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले आहेत. आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही. मात्र, त्यांचा हा केवळ सत्तेसाठी चाललेला खेळ आहे. विधानसभेच्या अगोदरही अशा प्रकारचे प्रयत्न झाले. दंगली भडकविण्याचे काम झाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याची सुरुवात संगमनेरमधून होत आहे असे स्पष्ट दिसते.” तसेच गृहमंत्र्यांना उद्देशून त्यांनी म्हटले, “आम्ही सांगण्याची गरज नाही. गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून कारवाई केली पाहिजे.”

राज्याच्या राजकीय पातळीवर टीका

थोरात म्हणाले, “देशाची राजकीय पातळी खालावली आहे. राज्याच्या पातळीबाबत तर राजकारणाने तळ गाठला आहे. तिथले जे व्हिडिओ समोर आले त्यात कुठेही हल्ला झालेला नाही. जर हल्ला झाला असेल तर दाखवा. आणि माझे कार्यकर्ते असतील, तर मी देखील चौकशी करीन.”

आणखी वाचा

Comments are closed.