आमदार नसताना मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला, मिंधे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा दावा

विद्यमान आमदारांना विकासासाठी दोन कोटी रुपये मिळतात पण मी आमदार नसताना मला 20 कोटी रुपये मिळाले असा दावा मिंधे गटाचे नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. सरवणकर यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सदा सरवणक काही लोकांशी संवाद साधत होते. तेव्हा सरवणकर म्हणाले की, या बांधकामासाठी आपल्याला परवानगी नव्हती. पण ती आपण मिळवली. तुम्हाला म्हणून मी सांगतो देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे नेत्तृत्व आपल्याला लाभले आहे. विकासकामांसाठी विद्यमान आमदारांना 2 कोटी रुपयांचा निधी मिळतो. पण मी आमदार नसताना 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे असे सरवणकर म्हणाले.

Comments are closed.