‘मी माफी मागितली नाही..’ मोहसिन नक्वींनी भारतीय मीडियावर केले प्रश्न उपस्थित! जाणून घ्या सविस्तर

आशिया कप ट्रॉफीवर वाद चिघळताना दिसत आहे. अलीकडेच झालेल्या बैठकीत BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी ACC चे अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांना कडक प्रश्न विचारले होते. त्यानंतर माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला की, नकवींनी या मीटिंगदरम्यान माफी मागितली आहे (Mohsin Naqvi Apology).

तसेच असा दावा करण्यात आला की, लवकरच आशिया कप ट्रॉफी भारतात पाठवली जाईल किंवा भारताकडून कोणी ट्रॉफी स्वीकारेल. मात्र नक्वीनी आपल्या अलीकडील ट्विटमध्ये या सर्व अफवा खोडून टाकल्या आहेत.

मोहसिन नक्वींनी आपल्या अलीकडील सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, भारतीय माध्यमांनी तथ्यांवर नव्हे तर खोट्यावर टीका केली आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करतोय, मी काहीही चुकीचे केलेले नाही आणि मी BCCI कडून कधीही माफी मागितली नाही आणि मागणारही नाही. ह्या खोट्या अफवा फक्त प्रचारासाठी आहेत, ज्याचा उद्देश फक्त आपले लोक गोंधळात टाकणे आहे.

त्यांनी पुढे लिहिले, दुर्दैवाने भारताने सतत क्रिकेटमध्ये राजकारण घुसवले आहे, ज्यामुळे खेळाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. ACC चे अध्यक्ष असल्याने, मी त्या दिवशी ट्रॉफी देण्यास तयार होतो आणि आता देखील तयार आहे. जर त्यांना ट्रॉफी घेणे असेल, तर त्यांचे स्वागत आहे की ACC कार्यालयात येऊन माझ्याकडून ट्रॉफी घ्या.

यापूर्वी असे सांगितले गेले होते की, आशियाई क्रिकेट काउंसिलच्या बैठकीत ट्रॉफीच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली होती. सूत्रांच्या मते नक्वींनी भारतीय खेळाडूंवर फायनलनंतर अपमान करण्याचा आरोप केला होता. बैठकीत भारताचे प्रतिनिधी राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले की, आशिया कप ट्रॉफी ही ACC ची मालमत्ता आहे आणि त्यावर कोणाचेही वैयक्तिक हक्क नाहीत.

Comments are closed.