प्रसिद्धीसाठी मला शुभमन गिलची गरज नाही, अभिनेत्री रिद्धिमा पंडितने अफेअरच्या चर्चांवर सोडले मौन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अभिनेत्री रिद्धीमा पंडित आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा गेले कित्येक दिवस रंगत होत्या. परंतु या चर्चांवर आता रिद्धिमाने मौन सोडले आहे. क्रिकेट आणि बॉलिवूडचे खूप जवळचे नाते आहे. दररोज, कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीचे नाव क्रिकेटपटूशी जोडले जाते. काही महिन्यांपूर्वी रिद्धिमा पंडित आणि शुभमन गिल यांच्याबद्दल बातम्या आल्या होत्या. दोघांच्या अफेअरच्या चर्चा बी टाऊनमध्ये खूप रंगू लागल्या होत्या. यातील महत्त्वाची मेख म्हणजे प्रसिद्धीसाठी रिद्धीमा शुभमन गिलसोबत आहे असे म्हटले गेले होते. त्यामुळेच याच मुद्दयावर आता रिद्धिमाने मौन सोडले आहे.

अलीकडे टेलिव्हिजन अभिनेत्री रिद्धिमा पंडित द ५० या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने स्वतःला उत्तम सिद्ध केले. रिद्धिमा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तसेच यावेळी तिला शुभमन गिलसोबतच्या तिच्या अफेअरबद्दल विचारण्यात आले. तिला असे विचारण्यात आले की, तिने प्रसिद्धी आणि पैशासाठी शुभमन गिलचे नाव स्वतःशी जोडले का… यावर ती गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “माझे नाव रिद्धिमा पंडित आहे. मी जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे.”

मला प्रसिद्धीसाठी मला शुभमन गिलची गरज नाही असे म्हणून तिने या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिले. रिद्धिमाने यापूर्वी स्पष्ट केले आहे की ती आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये नाहीत. त्यांच्या डेटिंगच्या अफवा खोट्या आहेत. रिद्धिमाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, एक काळ असा होता जेव्हा रिद्धिमा पंडित आणि हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान दोघे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी एकमेकांना तब्बल १० वर्षे डेट केले. परंतु त्यानंतर मात्र हे नाते कायम राहिले नाही. अखेर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.