“माझ्याकडे राज्यपाल किंवा राज्यसभेचे पद आहे….”; माजी सरन्यायाधीश राजकारणात येणार? पहा भूषण गवई काय म्हणाले

भूषण गवई हे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले
गवई यांनी ६ महिने सरन्यायाधीशपद भूषवले
राजकारणात प्रवेश करण्याबाबत केलेले महत्त्वाचे विधान
भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी एकूण ६ महिने सरन्यायाधीशपद भूषवले. भूषण गवई हे नुकतेच या पदावरून निवृत्त झाले आहेत. 14 मे रोजी त्यांनी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. गवई यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. दरम्यान, माजी सरन्यायाधीश न्या भूषण गवई एका मुलाखतीत राजकारण आणि अनेक विषयांवर भाष्य केले आहे.
भूषण गवई सरन्यायाधीश असताना 330 हून अधिक निकालांमध्ये सहभागी होते. त्यांनी 14 रोजी भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला एका मुलाखतीत भूषण गवई राजकारणात येण्यास इच्छुक आहेत? निवृत्तीनंतर काम करणार का? असे प्रश्न विचारले असता भूषण गवई यांनी यावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले भूषण गवई?
भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले, 'तुम्ही मला विचाराल तर मी कोणत्याही न्यायाधिकरणाचे प्रमुखपद किंवा राज्यपालपद स्वीकारणार नाही. मी राज्यसभेतील कोणतेही नामनिर्देशित पद स्वीकारणार नाही. यावर माझे स्पष्ट मत आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश असतील
केंद्र सरकारने गुरुवारी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३ वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती केली. न्याय विभाग, कायदा मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे विद्यमान सरन्यायाधीश बीआर गवई यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत आहे. केंद्रीय कायदा मंत्री अरुण राम मेघवाल यांनी सोशल मीडियावर नियुक्तीची घोषणा केली. “भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 24 नोव्हेंबर 2025 पासून भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो.”
मोठी बातमी! न्यायमूर्ती सूर्यकांत होणार भारताचे 53 वे सरन्यायाधीश; चार्ज कधी घ्यायचा ते जाणून घ्या
कार्यकाळ 15 महिन्यांचा असेल
विद्यमान सरन्यायाधीश बी.आर. गवई 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते सुमारे 15 महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहतील. ते 9 फेब्रुवारी 2027 रोजी वयाच्या 65 व्या वर्षी निवृत्त होतील.
Comments are closed.