आरोपीला मी स्वत: पाहिलं! तो पळत असताना मी त्याला पकडलं अन्…,आरोपीला पकडून देणाऱ्या गणेश गव्हा
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">पुणे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आलं आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतलं आहे. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडामध्ये लपून बसला होता. गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस पथके त्याच्या मागवर होती. तब्बल अडीचशेपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त, स्थानिक नागरिकांची मदत गाडेला पकडण्यासाठी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर डॉग स्कॉड, ड्रोनद्वारे देखील पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला होता. मात्र त्यावेळी सापडला नाही, रात्री उशिरा एक ते दीड वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
स्वारगेट बस स्टॅंडवरील बलात्कार केल्यानंतर नराधम आरोपी दत्तात्रय गाडे आपल्या गुणाट या गावातच लपला असल्याचा संशय पोलिसांना होता. दोन दिवस उसात लपून बसलेला आरोपी पाणी पिण्यासाठी दोन दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला आणि पोलिसांनी त्याच मागावरून तपासाला सुरूवात केली. अखेर रात्री एक वाजता हा आरोपी बेबी कॅनलमध्ये झोपून असताना शोध घेणाऱ्या पोलिसांना दिसून आल्यावर त्याला तातडीने पकडून त्याला गाडीत घालून पुण्याला आणण्यात आलं आहे. अशातच आरोपीला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी व्हिडीओ शेअर करत नेमकं काय-काय घडलं? याचा खुलासा केला आहे.
गणेश गव्हाणे काय म्हणाले?
गणेश गव्हाणे यांनी व्हिडीओ शेअर करत म्हणाले, गेले तीन दिवस आरोपी गाडे याचा शोध पोलीस आणि गुणाट गावातील ग्रामस्थ घेत होते. रात्री 10 वाजता आरोपीची चाहूल लागली. आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. आरोपी ताब्यात घेतला तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना कॉल केला आणि पोलीस यंत्रणा तात्काळ आली. गावातील सर्वजण पोलिसांना मदत करत होतो. पोलिसांनी प्रत्येकाची विचारपूस केली होती. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये भीतीदायक वातावरण होतं. पोलिसांनी माझ्या भावाला मारलं, त्यामुळे आम्ही त्याच्या रागातून आरोपीला शोधण्याच्या प्रयत्नात होतो. गुणाट गावातील जीपीएल क्रिकेट सामने भरवले जातात, तेथील चंदनवस्ती आहे, तिथं आरोपी फिरत होता. आरोपीला मी स्वत: पाहिलं आणि तो पळत असताना मी त्याला पकडलं. त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मी कळवलं, असं गणेश गव्हाणे याने म्हटलं आहे.
नराधम आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला होता, त्याचबरोबर श्वान पथकाच्या माध्यमातूनही दत्ता गाडेला शोधण्याचा प्रयत्न कालपासून सुरू होता. काल साडेचार तास ही शोध मोहीम सुरू होती, पण या शोध मोहिमेला रात्री उशिरा यश आलं. पोलिसांची 100 जणांची तुकडी गुणाट गावामध्ये दाखल झाली होती. हे 100 पोलीस ऊसाच्या शेतात घुसून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होते.
गाडेचा ड्रोनद्वारे शोध, 250 पोलिसांचा फौजफाटा
नराधम दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना झाली होती. त्याच्या गुनाट (ता. शिरूर) या गावी डॉग स्क्वॉड व ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यात आला होता. गावाच्या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने तो त्या ठिकाणी लपून बसल्याची शक्यता होती. काल गुरूवारी दुपारपासून ते संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी ड्रोनद्वारे त्याचा शोध थांबवला.
मात्र, गावात ये-जा करण्यासाठी 3 असलेल्या प्रत्येक मार्गावर 24 तास नाकाबंदी सुरू असून, सुमारे 250 पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावात आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री गाडेच्या मित्र-मैत्रिर्णीसह आई-वडिलांकडेही चौकशी केली.
मला पश्चात्ताप होतोय!
रात्री दीडच्या सुमारास दत्तात्रय गाडे नातेवाईकांकडे पाणी प्यायला आल्यानंतर, मला पश्चाताप होत आहे. मला सरेंडर व्हायचं आहे, असे तो बोलला. गेल्या दोन दिवसांपासून तो उसाच्या शेतात अन्न पाण्याशिवाय लपून बसून होता. आरोपीला घेऊन पुणे पोलिसांचे पथक पहाटे पुण्यात दाखल झाले आहे.
Comments are closed.