IND vs OMAN: कर्णधार सूर्यकुमार यादव विसरला चक्क संघातील खेळाडूचे नाव? जाणून घ्या मजेशीर खुलासा समोर!
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेतील लीग स्टेज मधील टीम इंडियाचा शेवटचा सामना ओमान संघाविरुद्ध आज म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी खेळला जात आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर टीम इंडियाने सुपर- 4 मध्ये आधीच स्थान निश्चित केले आहे.
टीम इंडियाने आजच्या सामन्यासाठी जेव्हा नाणेफेक जिंकली त्यादरम्यान रवी शास्त्री यांनी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) विचारले की, प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल आहे का? त्यावेळी सूर्यकुमार यादव म्हणाला, हर्षित खेळेल पण दुसरा खेळाडू कोण आहे ते त्याला आठवले नाही आणि त्याने म्हटले, मला वाटतं मी रोहितसारखा झालोय.
इंडिया विरुद्ध ओमान सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन:
टीम इंडिया: अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव (कर्नाधर), टिळ वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, आर्शदीप सिंग, कुल्डीप यादव.
ओमान: जतुंदार सिंग (कर्नाधरा), वीअर कालीम, हमाद मिर्झा, विनायक शुक्ला
मोहम्मद नदीम, आर्यन बिश्ट, जितेन्कुमार रामानंदी, फैसल शाह, झुनिया इस्लाम, सामे श्रीवास्तव, शकील अहमद
Comments are closed.