विश्वचषक खेळायचाच होता; पण बाहेर बसावं लागलं! संघाबाहेर ठेवल्याने सिराजची खंत

विश्वचषक स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. त्या स्वप्नाची झलक अनुभवूनही पुन्हा एकदा त्यापासून दूर ठेवण्यात आलं, ही सल हिंदुस्थानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजच्या शब्दांतून स्पष्टपणे जाणवत होती. 2024 च्या टी-20 विश्वचषकाचा भाग असलेला सिराज यंदाच्या 2026 टी-20 विश्वचषक संघात नाही, याबद्दल त्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

मी 2024 च्या टी-20 विश्वचषकात खेळलो होतो. तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. यंदा मात्र मी संघाचा भाग नाही, हे नक्कीच खटकतं. अशा मोठय़ा स्पर्धांमध्ये खेळायला प्रत्येकालाच आवडेल आणि मलाही आवडलं असतं, अशा स्पष्ट शब्दांत सिराज म्हणाला. 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी घोषित करण्यात आलेल्या हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघात त्याचं नाव नसल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात असतानाच स्वतः सिराजलाही हा निर्णय पचनी पडलेला नाही, तरीही संघाबाहेर राहिल्याची खंत असली तरी संघाविषयी कटुता व्यक्त न करता सिराजने मोठेपणा दाखवला. ‘हिंदुस्थानने वर्ल्डकप जिंकावा अशा शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.