आता मी लग्न करणार नाही, लेडी सलमान खान बनणार; युजवेंद्र चहलसोबतच्या नात्यानंतर धनश्री वर्माने घेतला निर्णय

नृत्यदिग्दर्शक आणि अभिनेत्री धनश्री वर्मा सध्या एका रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. तिने या वर्षाच्या सुरुवातीला युजवेंद्र चहलला घटस्फोट दिला. तेव्हापासून तिने मौन बाळगले होते. परंतु तिच्या मागे मात्र अनेकजण विविध तर्क वितर्क मांडत आहेत. पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये धनश्री आणि चहलचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाने मीडियाला चांगलेच खाद्य पुरवले. चहलच्या चाहत्यांनी धनश्रीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट, लग्नाच्या चार वर्षानंतर तुटलं नातं

“राईज अँड फॉल” मध्ये धनश्री वर्माने स्पर्धक अरबाज पटेलसोबत तिच्या घटस्फोटाची चर्चा केली. तिने तिच्याशी तिच्या मनातील भावना शेअर करत म्हटले की, सोशल मीडियावर आणि इतरत्र सुरू असलेल्या सर्व चर्चा निराधार आहेत. धनश्री वर्मा म्हणाली, घटस्फोटाच्या या सर्व अफवा बनावट आहेत. मी आधीच त्याच्यापासून दूर गेले होते.

धनश्रीने ठामपणे स्पष्ट केले की, आता या सर्व चर्चांना काहीच अर्थ नाही. अरबाज पटेलनेही यावर तिची बाजू घेत तिला साथ दिली. दोन्ही स्पर्धकांमधील या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

याच शोमध्ये नयनदीप रक्षित आणि पवन सिंग यांच्याशी झालेल्या, खुल्या संभाषणात धनश्रीने खुलासा केला की ती तिचा एकटेपणा एन्जॉय करत आहे. तसेच ती आता जोडीदार शोधण्याच्या किंवा लग्न करण्याच्या कोणत्याही विचारात नाही. अधिक बोलताना ती म्हणाली, मला आता माझ्या आयुष्यात कोणाचीही गरज नाही. मी माझ्या नात्यांमध्ये खूप काही बरे वाईट अनुभवले आहे. आता मी या इंडस्ट्रीतील लेडी सलमान खान बनेन.

Comments are closed.