पाकिस्तानमधील अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग झाला का? IAEA ने दिली स्पष्ट माहिती

हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये अलीकडेच झालेल्या लष्करी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पाकिस्तानमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर हिंदुस्थानने हल्ला केल्याच्या अफवा पसरविल्या जात होत्या. हिंदुस्थानच्या सैन्याने अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्याचे वृत्त आधीच फेटाळले होते. आता यावर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) ने स्पष्टपणे सांगितले आहे की,पाकिस्तानमधील कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग अथवा विकिरणाचा प्रसार झालेला नाही.
IAEA च्या प्रवक्त्याने पीटीआयशी बोलताना म्हटले की, ‘IAEA कडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पातून किरणोत्सर्ग किंवा विकिरणाचे उत्सर्जन झाल्याचा कोणताही पुरावा नाही’.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला, असा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट्सनंतर समोर आली आहे.
दरम्यान, हिंदुस्थानच्या हवाई दलाचे महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी 12 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘किराना हिल्स’वर कोणताही हल्ला करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. ‘किराना हिल्सवर आम्ही हल्ला केलेला नाही. तेथे जे काही आहे, ते आम्ही लक्ष्य केलेले नाही’, असे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थानचे हवाई हल्ले सरगोधा येथील एका लष्करी तळावर केंद्रित होते. काही अहवालांमध्ये हे तळ किराणा हिल्समधील भूमिगत अणु भांडारांशी संबंधित असल्याचा उल्लेख केला जात आहे, परंतु यासंबंधी अधिकृत दूजोरा मिळालेला नाही.
#Iaea #Pacistannuclear #India pacistan #ikiranahils #radiationlak
आयएईए पुष्टी करतो: संघर्षात पाकिस्तानच्या अणु सुविधांमधून रेडिएशन गळती नाही
Comments are closed.