IAS अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजीनामा.
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. आपल्या निर्णयासंबंधी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक संदेशही पोस्ट केला आहे. आपण स्वत:च्या इच्छेने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे दिव्या यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. आपला 13 वर्षांचा प्रवास अविस्मरणीय राहिला आहे. लंडनमध्ये नोकरी केल्यानंतर आपल्याला भारताची उभारणी करण्यासाठीही अनेक गोष्टी करण्याची संधी मिळाल्याने खूप काही शिकायला मिळाले, असेही त्यांनी आपल्या भावुक संदेशात म्हटले आहे. आयआयटी आणि आयआयएममधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये काम केले होते. याचदरम्यान यूपीएससी परीक्षा देताच 13 वर्षांपूर्वी त्यांची ‘आयएएस’मध्ये निवड झाली होती.
Comments are closed.