ICCची मोठी कारवाई! हरिस रौफला दोन सामन्यांची बंदी, बुमराह आणि सूर्यकुमारलाही बसला दंडाचा फटका
यंदाच्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांनी फक्त मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही भरपूर रंगत आणली होती. आता दोन महिन्यांनंतर, त्या तिन्ही वादग्रस्त सामन्यांवर आयसीसीने अखेर कारवाई केली आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफ याला 14 आणि 28 सप्टेंबर रोजीच्या सामन्यांतील गैरवर्तनामुळे दोन सामन्यांची बंदी ठोठावण्यात आली आहे. त्याचबरोबर, भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवलाही आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.21 चं उल्लंघन केल्याबद्दल सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.
14, 21 आणि 28 सप्टेंबरला झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यांनंतर, आयसीसीच्या एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीजच्या सदस्यांनी संबंधित खेळाडूंच्या वर्तनावर सुनावणी घेतली. सूर्यकुमारवर ‘खेळाची प्रतिमा खराब करणारे वर्तन’ केल्याचा आरोप सिद्ध झाला, तर रौफला सलग दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली.
सुपर-4 च्या सामन्यात भारताविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर ‘गन सेलिब्रेशन’ केल्याबद्दल पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहान यालाही दोषी ठरवण्यात आले. त्याला एका डिमेरिट पॉइंटसह अधिकृत इशारा देण्यात आला आहे.
भारताविरुद्ध खेळताना फरहानने बंदूक चालवण्याच्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन केलं होतं, तर हरिस रौफने सीमारेषेजवळ उभ्या भारतीय फॅन्सकडे पाहून ‘विमान पाडण्याचे’ आणि ‘6-0’ असे इशारे केले होते. या वर्तनामुळे भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.
बीसीसीआयने या दोन्ही पाकिस्तानी खेळाडूंविरुद्ध मॅच रिफरी अँडी पायकॉफ्ट यांच्याकडे तक्रार दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली होती. याशिवाय, रौफ आणि भारतीय खेळाडू अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल यांच्यातील वादावरही भारताने आक्षेप नोंदवला होता.
Comments are closed.