रोहित शर्माची चॅम्पियन्स ट्रॉफीतून उचलबांगडी; आयसीसीने जाहीर केला संघ
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. हा सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. त्यानंतर फक्त एक दिवसानंतर, आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला 12 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
यामध्ये अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. चॅम्पियन भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले नाही. तर यजमान पाकिस्तान संघातील एकाही खेळाडूचा समावेश नव्हता. या स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला होता, त्यापैकी फक्त 3 संघांमधून 12 सदस्यीय संघ निवडण्यात आला होता. हे तीन देश म्हणजे भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान. या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात भारतीय संघातील 6 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. हे खेळाडू म्हणजे विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल.
याशिवाय, उपविजेत्या न्यूझीलंड संघातील 4 खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. हे खेळाडू म्हणजे रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री. या संघाची कमान म्हणजेच कर्णधारपद सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. तर अफगाणिस्तानच्या 2 खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. हे खेळाडू म्हणजे इब्राहिम झद्रान आणि अझमतुल्ला उमरझाई.
दुसरीकडे, पाकिस्तान या स्पर्धेचे यजमान होते. पण त्याच्या संघातील एकाही खेळाडूला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळालेले नाही. पाकिस्तान संघ एकही सामना न जिंकता 5 दिवसांत स्पर्धेतून बाहेर पडला. पाकिस्तान वगळता दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि इंग्लंडमधील कोणत्याही खेळाडूला स्थान मिळाले नाही.
आयसीसीचा 12 सदस्यीय चॅम्पियन्स ट्रॉफी संघ – रचिन रवींद्र, इब्राहिम झद्रान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, अझमतुल्ला उमरझाई, मिशेल सँटनर (कर्णधार), मोहम्मद शमी, मॅट हेन्री, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल.
हेही वाचा –
“एकदा सुनील गावसकरने पाकिस्तानच्या भीतीने माघार घेतली होती”- इंजमाम उल हकचे वक्तव्य!
निवृत्तीच्या बातमीवर जडेजा गप्प; विजयानंतर रहस्यमय पोस्ट
ICCच्या सर्वोत्कृष्ट चॅम्पियन्स ट्रॉफी टीममध्ये भारताचे 5 खेळाडू , पाकिस्तानच्या पदरात निराशा!
Comments are closed.