जिंकण्यासाठी कोच गौतम गंभीर खरंच खालच्या स्तरावर गेला का? जाणून घ्या काय सांगतो ICC चा नियम
आयसीसी कन्स्यूशन पर्याय नियम काय आहे : हार्दिक पांड्या, शिवम दुबे यांच्या अर्धशतकांनंतर रवी बिश्नोई आणि हर्षित राणा यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथ्या टी-20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर 15 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. भारताने 20 षटकांत 9 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली. पण पाहुण्या इंग्लंडला 19.4 षटकांत सर्वबाद 166 धावांवर रोखत भारताने विजय मिळवला.
खरंतर, या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा एक निर्णय सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जो म्हणजे हर्षित राणाला संघात घेणे. त्याने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हर्षित राणाने शिवम दुबेच्या जागी पदार्पण केले आणि 3 विकेट घेतल्या. पण आता सोशल मीडियावर इंग्लंड संघाचे अनेक स्टार खेळाडू टीम इंडियावर बेईमानीचा आरोप करत आहे. आपण जाणून घेऊया की आयसीसीचा कन्कशन सबस्टिट्यूट नियम काय आहे आणि तो कसा अंमलात आणला जातो?
जाणून घ्या काय सांगतो ICC चा कन्कशन नियम
आयसीसीच्या नियमात असे म्हटले आहे की, कन्कशन पर्याय हा ज्या खेळाडूचा बदली असेल तो तिच भूमिका बजावणारा असायला हवा. म्हणजे गोलंदाजाला-गोलंदाज, फलंदाजाला-फलंदाज आणि ऑलराउंडरला-ऑलराउंडर. पण शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे, जो मध्यमगती गोलंदाजी शकतो, दुसरीकडे, राणा हा एक स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज आहे. म्हणजे या सामन्यात, एका ऑलराउंडरऐवजी एका गोलंदाजाचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला.
आयसीसीचा कलम 1.2.7.4 सांगतो की, “कन्कशन रिप्लेसमेंटला सारखे खेळाडू मानले जावे की नाही याचे मूल्यांकन करताना, आयसीसी मॅच रेफरीने उर्वरित कालावधीत खेळाडूने खेळलेली संभाव्य भूमिका विचारात घ्यावी. सामना आणि सामान्य भूमिका जी कन्कशन रिप्लेसमेंटद्वारे केली जाईल. त्यामुळे आयसीसी मॅच रेफ्रीने राणाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्याची परवानगी देण्यात आली होती. कारण तिच भूमिका दुबेने बजावली असती, त्यामुळे राणा संघात कायम राहिला. लाइक फॉर लाइक या नियमासाठी आणखी समर्थन म्हणजे दोन्ही खेळाडू वेगवान गोलंदाज आहेत.
टीम इंडियावर बेईमानी केल्याचा आरोप
पण आता, सोशल मीडियावर भारतीय संघावर बेईमानी केल्याचा आरोप होत आहे. एका व्यक्तीने म्हटले की अष्टपैलू खेळाडूची जागा फक्त एका अष्टपैलू खेळाडूने घ्यायला हवी होती. शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू असल्याने, त्याच्या जागी पूर्णवेळ गोलंदाज हर्षित राणाला घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच वेळी, कोणीतरी संपूर्ण भारतीय संघावर आणि विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
हे ही वाचा –
अधिक पाहा..
Comments are closed.