आयसीसीकडून गलतीसे मिस्टेक, रोहित शर्मा अन् विराट कोहली पुन्हा टॉप टेनमध्ये, अखेर चूक सुधारली
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं जारी केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत धक्कादायक प्रकार घडला होता. भारताचा वनडे क्रिकेटमधील कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नाव टॉप 100 मधून बाहेर काढली गेली होती. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावं वनडे रँकिंगमध्ये नसल्यानं दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोशल मीडियावर गोंधळ झाल्यानंतर आयसीसीनं चूक सुधारली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचा समावेश वनडे रँकिंगमध्ये पुन्हा करण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यातील वन डे रँकिंगमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे टॉप-5 मध्ये होते.मात्र, या आठवड्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव रँकिंगमधून गायब झाल्यानं दोघांच्या चाहत्यांनी आयसीसीचे रँकिंग संदर्भातील नियम देखील तपासून पाहिले. आयसीसीच्या नियमानुसार दोघांची नावं आयसीसीच्या रँकिंगमध्ये असणं गरजेचं होतं.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावांचा पुन्हा एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये घेण्यात आली आहेत. आयसीसीकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं नाव वगळलं गेल्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी आज आमच्या रँकिंगच्या तालिकेत एक त्रुटी होती, ती चूक सुधारण्यात आली आहे, असं सांगितलं.
आयसीसीच्या नियमानुसार एखादा खेळाडू 9-12 महिन्यांच्या काळात एकदिवसीय सामना खेळला नसेल तर त्याचं नाव रँकिंगमधून हटवलं जातं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभाग घेतला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या दमदार कामगिरीमुळं भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं.
नव्या रँकिंगमध्ये कोण टॉपवर?
शुभमन गिल 784 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 756 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर, विराट कोहली 736 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा क्रिकेटपटू 739 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा टी 20 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह कसोटीतील वेगवान गोलंदाज रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर तर रवींद्र जडेजा कसोटीतील ऑलराऊंडर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्या टी 20 मध्ये ऑलराऊंडर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराज वनडेतील गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. महाराजनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामने खेळले होते. त्यात त्यानं पहिल्या मॅचमध्ये 33 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर महीश तीक्षणा आहे. तिसऱ्या स्थानावर कुलदीप यादव 650 गुणांसह आहे.
आणखी वाचा
Comments are closed.