टी20 वर्ल्डकपमध्ये खेळतीयं 5 भावांची जोडी! त्यात आणखी एका जोडीची भर, मात्र खेळणार वेगवेगळ्या संघांकडून

भारत आणि श्रीलंका येथे सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये अनेक देशांना त्यांच्या ठरवलेल्या संघांमध्ये बदल करावा लागला आहे. अनेक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाले असून त्यांच्याजागी बदली खेळाडूंना निवडण्यात आले. नुकतेच एका संघाने २९ वर्षीय खेळाडूला संघात घेतले आहे. त्याचा एक भाऊ आधीच या स्पर्धेत खेळत आहे, मात्र त्याबाबत एक खास माहिती आहे.
आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये अनेकदा बहिण-भावांची जोडी एकत्र खेळताना पाहिली आहे. क्रिकेटमध्येही अनेकदा दोन भाऊ एकत्र खेळताना दिसले. या टी२० विश्वचषकातही ५ भावांची जोडी खेळत आहे. त्यामध्ये ईटलीच्या जस्टिन मोस्का आणि ऍंथोनी मोस्का, बेन मॅनेंटी आणि हॅरी मॅनेंटी यांचा समावेश आहे. आयर्लंडकडून हॅरी टेक्टर आणि टिम टेक्टर, रॉस अडायर आणि मार्क अडायर, नेपाळकडून आसिफ शेख आणि आरिफ शेख या बंधूंची जोडी सध्या खेळत असून त्यामध्ये आणखी एका जोडीची भर पडली आहे. यामध्ये विशेष असे की आधीच्या चार जोड्या एकाच संघाकडून खेळत असून पाचव्या जोडीमधील दोन्ही भाऊ मात्र वेगवेगळ्या संघांकडून खेळताना दिसतील.
झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज ब्रेंडन टेलर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला असून त्याच्याजागी बेन करनला संघात घेतले आहे. बेन हा इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनचा भाऊ आहे. तो सध्या या विश्वचषकात इंग्लंडकडून खेळत असून चांगली कामगिरी करत आहे. बेनला आयसीसीनेही मंजुरी दिली आहे. यामुळे तो लवकरच स्पर्धेत खेळताना दिसणार.
बेन वरच्या फळीतील फलंदाज असून त्याने सध्यातरी झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण केलेले नाही. त्याने झिम्बाब्वेकडून वनडे आणि कसोटी सामने मात्र खेळले आहेत. तसेच झिम्बाब्वेच्या स्थानिक टी२० लीगमध्ये ८ सामन्यात २०९ धावा केल्या होत्या. त्या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिला.
दुसरीकडे सॅम सध्या स्पर्धेत खेळत आहे. त्याने नेपाळविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात १० धावांचा बचाव करताना केवळ ५ धावा दिल्या आणि संघाला मोठ्या पराभवापासून वाचवले.
सॅम आणि बेन यांना आणखी एक भाऊ आहे. टॉम करन इंग्लंडकडून क्रिकेट खेळतो. तसेच या तिघांच्या वडिलांनी केविन करन यांनी झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे.
Comments are closed.