T20 WC26: आतापर्यंत तीन संघ झालेत स्पर्धेबाहेर, भारताबरोबर दोन संघ सुपर-8 मध्ये दाखल

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत आतापर्यंत २७ सामने खेळले गेले आहेत. यांनतर तीन संघ स्पर्धेबाहेर झाला आहेत. त्यातील काहींचे ग्रुपमधील सामने संपले असून काही संघ पुढच्या फेरीसाठी अपात्र आहेत. तसेच दोन संघांनी सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे.
भारताने रविवारी (१५ फेब्रुवारी) पाकिस्तानला पराभूत करत सुपर-८चे तिकीट मिळवले. दुसरीकडे दोन वेळेचा टी२० चॅम्पियन वेस्ट इंडिजनेही सुपर-८मध्ये प्रवेश केला आहे. स्पर्धेबाहेर होणाऱ्या संघांमध्ये नेपाळ, ओमान आणि नामिबिया यांचा समावेश आहे. ग्रुप डी मधून कोणताच संघ बाहेर झाला नाही आणि कोणताच संघ सुपर-८ मध्ये पोहोचला नाही.
ग्रुप ए मध्ये पाहिले तर भारताने सलग तीन विजय मिळवत सुपर-८ मध्ये पोहोचला. दुसऱ्या स्थानावर यूएसए आहे, त्यांनी ४ पैकी २ सामने जिंकले आहेत. पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर असून त्यांनी ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. नेदरलॅंड्सचा एक सामना बाकी असून त्यांनी ३ पैकी एकच सामना जिंकला आहे. नामिबियाने मात्र ३ पैकी ३ सामने गमावले आहेत.
ग्रुप बी मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वेने २ पैकी २ सामने जिंकले असून ते गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाने २ पैकी एक सामना जिंकला असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. आयर्लंडने ३ पैकी एक सामना जिंकत चौथे स्थान गाठले आहे. ओमानने ३ पैकी ३ सामने गमावले असल्याने ते स्पर्धेबाहेर झाले आहेत.
ग्रुप सी मध्ये वेस्ट इंडिज ३ पैकी ३ सामने जिंकत सुपर-८ मध्ये पोहोचला. इंग्लंड मात्र ३ पैकी २ सामने जिंकत गुणतालिकेत दुसऱ्या, स्कॉटलंड ३ पैकी एक सामना जिंकत तिसऱ्या आणि ईटली २ पैकी एक सामना जिंकत चौथ्या स्थानावर आहे. यामधील नेपाळने खेळलेले तिन्ही सामने गमावले असून ते स्पर्धेबाहेर झाले आहेत.
ग्रुप डी मध्ये मात्र तगडी स्पर्धा सुरू आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ३ पैकी ३ सामने जिंकले असले तरी ते सुपर ८ मध्ये पोहोचले नाहीत. न्यूझीलंडने ३ पैकी २ सामने जिंकत गुणतालिकेत दुसरे, यूएईने २ पैकी एक सामना जिंकत तिसऱे, अफगाणिस्तान २ पैकी २ सामने गमावत चौथे आणि कॅनडाही २ पैकी २ सामने गमावत पाचवे स्थान गाठले आहे.
आज (१६ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचे सामने असून त्यांच्यासाठी करो वा मरो अशी स्थिती आहे. अफगाणिस्तानने यूएईविरुद्धचा सामना गमावला तर ते स्पर्धेबाहेर जातील.
Comments are closed.