टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये आज एक संघ थेट घरी आणि एकाला मिळणार सुपर-8 चे तिकीट! जाणून घ्या कसे

क्रिकेटविश्वात सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत आतापर्यंत २१ सामने खेळले गेले आहेत. ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या स्पर्धेता ७ दिवस झाले असून, सध्यातरी एकाही संघाला सुपर-८ चे तिकीट मिळालेले नाही. तसेच कोणताही संघ बाहेर झालेला नाही, मात्र आज (१४ फेब्रुवारी) एक संघ बाहेर जाणार हे नक्की आहे. त्यामुळे एका संघाचे सुपर-८ चा प्रवेश निश्चित होणार आहे. ते कसे जाणून घेऊ,
आजही तीन सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना आयर्लंड विरुद्ध ओमान, दुसरा इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड आणि तिसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा आहे. यातील एक सामना असा होणार ज्यामध्ये एक संघ पराभूत झाला तर थेट स्पर्धेबाहेर जाणार आणि जिंकलेला संघ सुपर ८ मध्ये पोहोचण्याची शक्यता अधिक आहे.
आयर्लंडविरुद्ध ओमान सामन्यात जिंकणारा संघ सुपर ८च्या शर्यतीत कायम राहणार, मात्र त्यांना स्थान पक्के करण्यासाठी दुसऱ्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास येथेच संपेल. हे दोन्ही संघ ग्रुप बी च्या गुण तालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. या सामन्यात विजय मिळवल्यावर त्यांचे स्पर्धेतील स्थान टिकेल, मात्र पराभूत होणारा संघ थेट बाहेर जाणार आहे.
सुपर ८ मध्ये कोणता संघ जाईल हे पाहिले तर ग्रुप डी मधील दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड निश्चितच आहेत. दोन्ही संघांनी २-२ सामने जिंकले असून आणखी एक सामना जिंकला तर त्यांचे ६ गुण होतील. आजचा सामना मात्र या दोघांमध्येच आहे. ज्यामध्ये जो संघ जिंकेल तर त्याचे सुपर ८चे तिकीट पक्के. पराभूत झालेला संघ बाहेर नाही जाणार, तर त्याच्याकडे आणखी एक संधी असेल.
तसेच या दोन्ही संघांची कामगिरी पाहता सुपर ८मध्ये जाण्यासाठी ६ अंक मिळवले की प्रवेश पक्का आहे. दोन्ही संघांच्या या प्रवेशाबाबत मात्र एक अडचण आहे. जर युएईने ६ अंक मिळवले, तर वेगळी स्थिती असणार आहे.
Comments are closed.