T20 WC26: ऐतिहासिक क्षण! झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये दाखल, ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मधील ३२वा सामना पावसामुळे रद्द झाला. हा सामना ग्रुप सी मधील आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे असा होता. जो आज (मंगळवार, १७ फेब्रुवारी) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार होता. नाणेफेक न होता हा सामना रद्द झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया ग्रुपस्टेजमधूनच स्पर्धेबाहेर झाला आहे आणि झिम्बाब्वे सुपर-८मध्ये पोहोचला आहे.
२०२४ च्या टी२० विश्वचषकात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या झिम्बाब्वे संघासाठी या हंगामात सुपर-८मध्ये पोहोचणे एक स्वप्नासारखेच आहे. त्याचबरोबर ते २०२८च्या टी२० विश्वचषकासाठीही पात्र ठरतील.
या स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया १७ वर्षानंतर ग्रुपस्टेजमधून बाहेर झाला आहे. याआधी ते २००९मध्ये ग्रुप स्टेजमधून बाहेर झाले होते. २०२१च्या विजेत्या संघासाठी आयर्लंडने हा सामना जिंकणे महत्वाचे होते.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.