आयसीसी वनडे क्रमवारीचा किंग विराट नाही तर 'हा' दिग्गज, सर्वाधिक दिवस टॉपवर असलेले फलंदाज

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना राजकोट (14 जानेवारी) येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या सुरूवातीलाच भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता समोर आली आहे. स्टार फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. असे असले तरीही आयसीसी वनडे क्रमवारीत लागोपाठ सर्वाधिक दिवस राहण्याचा मान मात्र कोहलीला नाही तर वेस्ट इंडिजच्या महान फलंदाजाला मिळाला आहे.

विव रिचर्ड्स हे आयसीसी वनडे क्रमवारीत सर्वाधिक दिवस पहिल्या स्थानावर राहिले आहेत. ते लागोपाठ 1748 दिवस अव्वल स्थानावर होते. ही कामगिरी त्यांनी जानेवारी 1984 ते ऑक्टोबर 1988 मध्ये केली. त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मायकल बेवन यांचा क्रमांक लागतो. ते जानेवारी 1999 ते जुलै 2002 मध्ये 1259 आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर होते.

या क्रमवारीत विराटचा क्रमांक तिसरा आहे. तो ऑक्टोबर 2017 ते एप्रिल 2021 दरम्यान 1258 दिवस पहिल्या क्रमांकावर राहिला. सध्या तो न्यूझीलंड विरुद्ध खेळत असून बेवनला मागे टाकण्याची संधी त्याच्याकडे आहे.

तसेच ऑस्ट्रेलियाचेच डीन जोन्स हे जानेवारी1990 ते फेब्रुवारी 1993 मध्ये एकूण 1146 दिवस पहिल्या क्रमांकावर होते. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचे आणखी एक दिग्गज ब्रायन लारा हे आयसीसी वनडे क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल क्रमांकावर राहण्याच्या यादीच पाचव्या स्थानावर राहिले. मार्च 1996 ते जानेवारी 1999 यादरम्यान ते 1040 दिवस पहिल्या क्रमांकावर राहिले होते.

आयसीसी वनडे ताज्या क्रमवारीनुसार भारताचे विराट व्यतिरिक्त रोहित शर्मा, कर्णधार शुबमन गिल, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे फलंदाजही टॉप 20 मध्ये आहेत.

Comments are closed.