ICC कडून वनडे, टी20 अन् कसोटीमधील टॉप 3 खेळाडू जाहीर; यादीत भारताचा डंका, अभिषेक-तिलक चमकले तर
ICC खेळाडू क्रमवारी 2025 : आयसीसीने 2025 मधील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर कसोटी, एकदिवसीय (वनडे) आणि टी20 या तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमधील टॉप-3 फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय क्रिकेटपटूंनी जबरदस्त वर्चस्व गाजवत जागतिक क्रिकेटवर आपली मोहोर उमटवली आहे.
2025 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सुवर्णकाळ ठरल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी, मोठ्या सामन्यांतील निर्णायक खेळी आणि दबावाखाली दाखवलेली परिपक्वता यामुळे भारतीय खेळाडूंनी आयसीसीच्या निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. भारतीय खेळाडूंनी तितक्याच ताकदीने कामगिरी करत आपण फक्त एका फॉरमॅटचे नाही, तर ऑल-फॉरमॅट पॉवरहाऊस आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
टी20 मध्ये भारतीयांचा बोलबाला
टी20 फॉरमॅटमध्ये आयसीसीने अभिषेक शर्मा याला नंबर-1 फलंदाज म्हणून मानांकन दिले आहे. दुसऱ्या स्थानावर फिल सॉल्ट, तर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा याची निवड झाली आहे. गोलंदाजांमध्ये वरुण चक्रवर्ती याने अव्वल स्थान पटकावले आहे. जेकब डफी दुसऱ्या, तर राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अष्टपैलूंमध्ये सॅम अयूब नंबर-1, सिकंदर रझा नंबर-2 आणि रोस्टन चेस तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
2025 मध्ये खेळाच्या सर्वात लहान स्वरूपातील व्यवसायातील सर्वोत्तम 🙌
नवीनतम ICC खेळाडू रँकिंगमधून अधिक 👉 https://t.co/eAkrnd9Vwr pic.twitter.com/LIPbIx1yh5
— ICC (@ICC) १ जानेवारी २०२६
वनडेमध्ये रोहितचा दबदबा
वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा याने नंबर-1 फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. विराट कोहली दुसऱ्या, तर डॅरिल मिचेल तिसऱ्या स्थानावर आहेत. गोलंदाजांच्या यादीत राशिद खान अव्वल, जोफ्रा आर्चर दुसरा आणि कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. अष्टपैलूंमध्ये अजमतुल्लाह उमरजई नंबर-1, सिकंदर रझा नंबर-2 आणि मोहम्मद नबी तिसऱ्या स्थानावर आहेत.
2025 च्या शेवटी पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यांतील काही उत्कृष्ट खेळाडू ICC खेळाडूंच्या क्रमवारीत चमकले 🙌
नवीनतम अपडेटवर अधिक 👉 https://t.co/eAkrnd9Vwr pic.twitter.com/igHF7vY4X7
— ICC (@ICC) १ जानेवारी २०२६
कसोटी क्रिकेटमध्ये जो रूट नंबर-1
कसोटी फॉरमॅटमध्ये जो रूट याला नंबर-1 फलंदाज म्हणून गौरवण्यात आले आहे. हॅरी ब्रूक दुसऱ्या, तर केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह याने अव्वल स्थान मिळवले आहे. मिचेल स्टार्क दुसऱ्या, तर नोमान अली तिसऱ्या क्रमांकावर आहेत. अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजा नंबर-1, मार्को यान्सन नंबर-2 आणि बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
ICC पुरुषांच्या कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत 2025 मध्ये तारेने जडलेला समूह बंद झाला 🤩
नवीनतम अपडेटवर अधिक 👉 https://t.co/eAkrnd9Vwr pic.twitter.com/NDVrvXzW3N
— ICC (@ICC) १ जानेवारी २०२६
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.